राष्ट्रपतींच्या हस्ते तिरंग्याचे ध्वजारोहन, नारी शक्तीचे कर्तव्यपथावर दर्शन
X
दिल्ली : आज संपूर्ण देशात 75 वा सुवर्णमहोत्सवी प्रजासत्ताक दिन साजरी होत आहे. आजच्या दिनी अर्थात 26 जानेवारी 1950 रोजी या देशात लोकशाही पध्दतीने देशाच्या राज्यकारभारास खऱ्या अर्थाने सुरूवात झाली. 26 जानेवारी हा दिवस प्रती वर्षी संपुर्ण देशात प्रजासत्ताक म्हणून मोठ्या उत्सवात साजरा केला जातो. यावर्षी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन हे प्रजासत्ताक दिनाच्या आयोजित कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आहेत. कर्तव्य पथावर आयोजित कार्यक्रमात परेडसाठी विशेष तयारी करण्यात आली असून सध्या दिल्लीचे छावणीमध्ये रुपांतर झालेले दिसून येते. प्रत्येक कानाकोपऱ्यावर सैनिकांकडून लक्ष ठेवले जात आहे.
यावेळेस पहिल्यांदाच तिन्ही सैन्य दल, निमलष्करी गट, आणि पोलीस दलाते नेतृत्व हे महिला करीत आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी कर्तव्यपथावर तिरंगा फडकावला. त्यानंतर प्रजासत्ताक दिनाच्या संचालनाला सुरूवात झाली. भारताची समृध्दतेने नटलेली सांस्कृतिक विविधता, एकता आणि प्रगती यासोबतच वृध्दिंगत होणाऱ्या नारीशक्तीचे दर्शन कर्तव्यपथावर होत आहे.