Home > News Update > विद्यार्थ्यांच्या आंदोलनप्रकरणी 'हिंदुस्तानी भाऊ' ला अटक

विद्यार्थ्यांच्या आंदोलनप्रकरणी 'हिंदुस्तानी भाऊ' ला अटक

दहावी बारावीची परीक्षा रद्द करण्यात यावी, या मागणीसाठी विद्यार्थ्यांना चिथावणी दिल्याप्रकरणी 'हिंदुस्तानी भाऊ' म्हणून ओळख असलेल्या विकास फाटक याला धारावी पोलिसांनी अटक केली.

विद्यार्थ्यांच्या आंदोलनप्रकरणी हिंदुस्तानी भाऊ ला अटक
X

दहावी बारावीची परीक्षा रद्द करण्यात यावी, या मागणीसाठी राज्यभरातून हजारो विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते. त्या विद्यार्थ्यांना चिथावणी दिल्याप्रकरणी विद्यार्थ्यांच्या आंदोलनप्रकरणी विकास फाटक याला धारावी पोलसांनी अटक केली.

सोशल मीडियावर हिंदुस्तानी भाऊ म्हणून ओळख असलेल्या विकास फाटक याने दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा रद्द करण्यासाठी रस्त्यावर उतरण्याचे आवाहन केले होते. त्यावरून मुंबई, नागपुर, अकोला यासह राज्यभरातून विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरून संताप व्यक्त केला. तर मुंबईतील धारावी भागात शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या बंगल्यासमोर विद्यार्थ्यांनी आंदोलन केले. त्यावेळी विद्यार्थ्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला होता. त्यामुळे हिंदुस्तानी भाऊ म्हणून ओळख असलेल्या विकास फाटक याने विद्यार्थ्यांना चिथावणी दिल्याने आणि त्याच्या आवाहनाला प्रतिसाद दिल्याने शिक्षणतज्ज्ञांनी चिंता व्यक्त केली.

दरम्यान शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी विकास फाटक याला चर्चेसाठी बोलावण्याची तयारी दर्शवली होती. तर दुसरीकडे विद्यार्थ्यांना आंदोलनासाठी चिथावणी दिल्याप्रकरणी विकास फाटक याच्याविरोधात सोशल मीडियासह, विद्यार्थ्यांच्या पालकांकडून संताप व्यक्त केला जात होता. मात्र दहावी बारावीची परीक्षा रद्द करण्याची अवाजवी मागणी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा खरा मास्टरमाईंड कोण याचा शोध घेण्याची मागणीही जोर धरू लागली आहे. त्यामुळे सोमवारी पोलिस विकास फाटक याचा शोध घेत होते. अखेर धारावी पोलिसांनी विकास फाटक याला अटक केली.

Updated : 1 Feb 2022 10:36 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top