Home > News Update > साताऱ्यात विहिरीमध्ये २० हजार लिटर पेट्रोल

साताऱ्यात विहिरीमध्ये २० हजार लिटर पेट्रोल

साताऱ्यात विहिरीमध्ये २० हजार लिटर पेट्रोल hindustan petroleum stealing was done through a hole in the petrol pipeline



एकीकडे पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढल्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागत आहे. तर महाराष्ट्रात सातारा जिल्ह्यामध्ये एका विहीरीत २० हजार लीटर पेट्रोल आढळले आहे. काय आहें हाँ सर्व प्रकार?



एकीकडे पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढल्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागत आहे. तर महाराष्ट्रात सातारा जिल्ह्यामध्ये एका विहीरीत २० हजार लीटर पेट्रोल आढळले आहे. जिल्ह्यामध्ये पेट्रोलची पाईपलाईन द्वारे चोरी करणारी टोळी पोलिसांच्या विळख्यात अडकली असून ७ जणांना पिंपरी चिंचवडहुन ताब्यात घेण्यात आलं आहे. 

दरम्यान या भागात सुमारे सात ते आठ पाण्याचे टँकर, गळती झालेले पेट्रोल गोळा करण्यासाठी पॉवर ट्रॅकरही मागवण्यात आले. तसेच या संपूर्ण परिसरात मोबाईल वापरासह कुणी शेकोटी करु नये, परिसराला वनवा लावू नये यासाठी कडेकोट बंदोबस्त लावला आहे.

मुंबई-पुणे-सोलापूर या २२३ किलोमीटर पर्यंत असलेल्या हिंदुस्थान पेट्रोलियम पाइपलाईनला मोठे भगदाड पाडून ही चोरी केली जात होती. धक्कादायक म्हणजे, पेट्रोल पाईपलाईन तशीच सोडून दिल्यामुळे परिसरातील विहिरीत पेट्रोलच पेट्रोल झाले आहे.

साताऱ्यातील सासवड जवळील गावामध्ये ही घटना घडली असून आजूबाजूच्या परिसरातील शेतीवर सुद्धा याचा परीणाम पाहायला मिळत आहे. अटक केलेल्या आरोपींनी महाराष्ट्रातील इतर अनेक जिल्ह्यात पेट्रोल चोरीच्या गुन्ह्याची कबुली दिली आहे.

अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये अनित हरिशंकर पाठक, बालू अन्ना चौगुले, मोतीराम शंकर पवार, इस्माइल पीर मोहम्मद शेख, शाम शिवाजी कंडी, दत्तात्रेय सोपान लोखंडे, नामदेव ज्ञानदेव जाधव यांचा समावेश आहे. ही टोळी मुख्यतः पिंपरी - चिंचवड आणि फलटणमधील रहिवाशी आहे.

पेट्रोल चोरीचा तपास करीत असलेले अधिकारी तानाजी यांनी माध्यमांशी बोलतांना सांगितलं की -

मिळालेल्या माहितीच्या आधारे 7 जणांना पकडण्यात आले आहे. या टोळीने डेपोमधून जाणारी १४ इंच जाड असणारी मेटलच्या पाईपलाईनमध्ये भगदाड पाडलं. जमिनीत पेट्रोल गळतीमुळे शेताच्या शेजारी असलेल्या विहिरींमध्ये पेट्रोल भरण्यास सुरवात झाली.

विहिरीमध्ये पेट्रोल भरल्यानंतर तेथील पेट्रोलसुद्धा काढून परत घेण्याची योजना त्यांनी आखली होती. परंतू तेल गळतीमुळे परिसरातील सुमारे 15 ते 20 एकर शेती खराब झाली. तेव्हा गावकऱ्यांनी शेती संदर्भात तक्रार केली असता विहिरींच्या पाण्याची तपासणी केली गेली. तेव्हा विहिरी पेट्रोलने भरलेल्या असल्याचे निदर्शनास आले. एका विहिरीत सुमारे 2000 लिटर पेट्रोल असल्याचा अंदाज वर्तवण्यात येतो आहे.

पेट्रोल चोरीची तक्रार एचपी कंपनीने पोलिसांकडे केली असता. तेव्हापासूनच पोलिस पेट्रोल चोरांच्या या टोळीचा शोध घेत होते.

Updated : 14 April 2021 5:00 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top