Jinah Tower : जिना टॉवरवर तिरंगा फडकवण्याचा प्रयत्न, पोलिसांकडून कलम 144 लागू
पाकिस्तानचे संस्थापक बॅरिस्टर मोहम्मद अली जीना यांच्या नावाने असलेल्या जीना टॉवरवर हिंदू वाहिनीच्या कार्यकर्त्यांनी तिरंगा फडकवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पोलिसांनी हिंदू वाहिनीच्या नेत्यांना ताब्यात घेतले. त्यामुळे प्रजासत्ताक दिनी देशात नवा वाद निर्माण झाला आहे.
X
प्रजासत्ताक दिनी आंध्र प्रदेशातील जीना टॉवरवर हिंदू वाहिनीच्या नेत्यांनी तिरंगा फडकवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर परिसरात मोठा तणाव निर्माण झाला. तर पोलिसांनी हिदू वाहिनीच्या नेत्यांना अटक केल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून परीसरात कलम 144 लागू केले.
आंध्र प्रदेशातील गुंटूर शहरात पाकिस्तानचे संस्थापक मोहम्मद अली जीन्ना यांच्या नावाचे एक टॉवर आहे. तर या टॉवरचे नाव बदलून डॉ. ए. पी. जे अब्दुल कलाम करण्यात यावे, अशी मागणी अशी मागणी 30 डिसेंबर रोजी भाजपच्या वतीने करण्यात आली होती. त्यानंतर प्रजासत्ताक दिनी हिंदू वाहिनीच्या नेत्यांनी टॉवरवर तिरंगा फडकवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी या परिसरात एकच गोंधळ झाला. तर परिस्थिती बिघडण्याच्या भीतीने परिसरात पोलिसांनी कलम 144 लागू केले. तर गुंटूर नगरपालिकेनेही याबाबत जीना टॉवरला घेराव घातला. त्यापार्श्वभुमीवर पोलिसांनी जीना टॉवर परिसरात मोठा फौजफाटा तैनात केला आहे.
स्वातंत्र्यपुर्व काळात 1945 साली मोहम्मद अली जीना एका सभेला संबोधित करण्यासाठी गुंटूर येथे आले होते. त्यावेळी स्थानिक मुस्लिमांनी एका मिनारला जीनांचे नाव दिले. त्या घुमटाकार टॉवरला लोक शांतता आणि सौदार्हाचे प्रतिक मानतात. मात्र याच टॉवरवर तिरंगा फडकवण्याचा प्रयत्न केल्याने वाद निर्माण झाला आहे. तर देशाची फाळणी आणि लाखो लोकांच्या मृत्यूला कारणीभूत असलेल्या जीना यांचे टॉवरला दिलेले नाव बदलून माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे अब्दुल कलाम किंवा दलित कवी गुर्राम जोशुआ यांचे नाव द्यावे, अशी मागणी तेलंगणातील भाजप आमदार राजा सिंह यांनी केली.