मुंबई मे बेठा है हिंदुओका राजा, राज ठाकरेंच्या ठाण्याच्या सभेचे हिंदीत पोस्टर
X
आज मनसेचे (mns)अध्यक्ष राज ठाकरे यांची ठाण्यात (thane)सायंकाळी साडेसहा वाजता सभा होणार आहे.एकेकाळी मराठीच्या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या (raj thackrey)) सभेचे पोस्टर हिंदीत लागले आहे.अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत.
मुंबई मे बेठा है हिंदुओका राजा अपनी हिफाजत चाहिए तो मनसेमे आजा. अशा वाक्याचे पोस्टर ठाण्यात लागले आहेत.मनसेने मराठीच्या मुद्द्याला मागे सोडले आहे का, अशा प्रश्न आता विचारला जातोय. मनसेने झेंड्याबरोबर मराठीचा मुद्दा हि बद्दलाय काय? असा प्रश्न उपस्थित होतोय.या सभेत राज ठाकरे कोणाला टार्गेट करणार हे महत्वाच ठरणार आहे.गुढीपाडव्या दिवशी शिवतीर्थावर राज ठाकरे यांनी केलेल्या भाषणानंतर राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं आहे, या भाषणात राज ठाकरेंनी मांडलेल्या मुद्य्यांवरून मोठ्याप्रमाणावर आरोप-प्रत्यारोपही झाल्याचे दिसून आले.
या सभेची जोरदार तयारी ठाण्यातील मनसे कार्यकर्त्यांनी केली आहे. सुमारे ४० हजारहून अधिकचा जनसमुदाय या सभेसाठी उपस्थित राहण्याची शक्यता मनसेकडून वर्तविली गेली आहे. तसेच मनसे आणि राष्ट्रवादीमध्ये सुरू असलेल्या शाब्दीक वादानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांनी संपूर्ण शहरात उत्तरसभा अशा आशयाचे फलक उभारले आहेत. त्यामुळे राज ठाकरे सभेत काय बोलणार? याकडे सर्वच राजकीय पक्षांचे लक्ष लागून आहे.