कॉंग्रेसला सोडचिठ्ठी देणारा नेता बनला आसामचा नवा मुख्यमंत्री...
राहुल गांधींच्या कुत्र्यामुळे सोडली कॉंग्रेस, आज आसामचे झाले आसामचे नवे मुख्यमंत्री...
X
कॉंग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपचं कमळ हातात घेतलेल्या हिमंत बिस्वा शर्मा (himanta biswa sarma) हे आसामचे नवे मुख्यमंत्री होणार आहेत. आसाममध्ये भाजपने दुसऱ्यांचा विजय मिळवला आहे. आसामचे विद्यमान मुख्यमंत्री धुरा सर्बानंद सोनोवाल यांनी 5 वर्षे राज्याची सूत्रं सांभाळली. केंद्रीय मंत्री असताना त्यांना राज्यात पाठवण्यात आलं होतं. मात्र, यावेळेला मुख्यमंत्री पदाची माळ हिमंत बिस्वा शर्मा यांच्या गळ्यात पडली आहे. हिमंत बिस्वा शर्मा यांनी जलुकबाडी मतदारसंघातून सलग पाचवेळा विजय प्राप्त केलाय.
कोण आहेत हिमंत बिस्वा शर्मा?
सलग पाच वेळा जलुकबाडी मतदारसंघातून निवडून येणाऱ्या हिमंत बिस्वा शर्मा यांनी 2015 ला कॉंग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला.
राहुल गांधींसोबत वाद
मी जेव्हा राहुल गांधींना भेटायला गेलो, तेव्हा त्यांचं लक्ष माझ्यापेक्षा त्यांच्या कुत्र्याकडे अधिक होतं. त्यांनी माझ्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं. ते पाळीव कुत्र्याला बिस्किट खाऊ घालत होते. असा आरोप करत शर्मा यांनी कॉंग्रेसला राम राम करक ठोकला होता.
कॉंग्रेसमध्ये मंत्री...
शिक्षण, आरोग्य आणि कुटुंब कल्याण, कृषी, योजना आणि विकास, पीडब्ल्यूडी आणि अर्थ या विभागाची मंत्री पद त्यांनी सांभाळली आहेत.
तरुण गोगाई आणि शर्मा वाद
2016 च्या निवडणुकीच्या तोंडावर माजी मुख्यमंत्री तरुण गोगाई यांच्यासोबत झालेल्या वादामुळे त्यांनी राहुल गांधी यांची भेट घेतल्यानंतर भाजपमध्ये प्रवेश केला होता..