राहुल गांधी सुखविंदर सिंग सुखू यांच्या शपथविधीला उपस्थित राहणार...
X
राजस्थानमध्ये राहुल गांधींच्या (Rahul Gandhi) भारत जोडो यात्रेचा आज सातवा दिवस आहे. बुंदीच्या बलदेवपुरा येथून आजचा प्रवास सुरू झाला आहे. आज यात्रेचा पहिला टप्पा संपल्यानंतर राहुल यांचा शिमल्याला (Himachal Pradesh) जाणार आहेत. काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश (Jayram Ramesh) यांनी ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे.
त्यांनी सांगितले की, आज सकाळी 13 किमीच्या प्रवासानंतर राहुल हिमाचल प्रदेशचे नवे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू यांच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर नियोजित वेळेपूर्वी राजस्थानला ते पार्ट येणार आहेत. दिवसभरात पुन्हा यात्रेत सामील होऊन 9 किलोमीटरचा प्रवास करेल. मुख्यमंत्री अशोक गेहलोत (Ashok Gehlot) हेही नव्या सरकारच्या शपथविधी सोहळ्यात सहभागी होणार आहेत, मात्र राहुल-गेहलोत स्वतंत्रपणे शिमल्याला पोहोचणार आहेत.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी, जयराम रमेश हे देखील आज भारत जोडो मध्ये चालत आहे. आज भारत जोडो यात्रेचा संपूर्ण कार्यक्रम कसा आहे ते देखील पाहू...
बुंदी जिल्ह्यातील केशोराईपाटन येथील बलदेवपुरा गावातून सकाळी ६.१५ वाजता भारत जोडो यात्रेला सुरुवात झाली आहे. यात्रेचा लंच ब्रेक लबन गावातील सीएडी कॅम्पसमध्ये सकाळी 10 वाजता ठेवण्यात आला आहे. पापडी गावातून दुपारी साडेतीन वाजता हा प्रवास सुरू होईल, प्रवासाचा शेवटचा मुक्काम लाखेरी रेल्वे स्टेशन चौकात सायंकाळी साडेसहा वाजता आहे. आजही राहुल गांधींची एकही स्ट्रीट कॉर्नर सभा नाही. यात्रेचा रात्रीचा मुक्काम बबई येथे ठेवण्यात आला आहे. बुंदी जिल्ह्यातील यात्रेचा आज शेवटचा दिवस आहे.