Home > News Update > कोल्हापुरातील हेरवाडे गावात ऐतिहासिक निर्णय, या निर्णयाने विधवा महिलांना सन्मानाने जगता येणार

कोल्हापुरातील हेरवाडे गावात ऐतिहासिक निर्णय, या निर्णयाने विधवा महिलांना सन्मानाने जगता येणार

कोल्हापुरातील हेरवाडे गावात ऐतिहासिक निर्णय, या निर्णयाने विधवा महिलांना सन्मानाने जगता येणार
X

विधवा प्रथा बंदीचा महत्वपुर्ण निर्णय कोल्हापूर जिल्ह्यातील हेरवाडे गावाने घेतलाय. या गावच्या सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी मिळून हा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. हा ऐतिहासिक निर्णय घेणाऱ्या ग्रामपंचायतीचे सरपंच आणि गावकरी यांनी एकत्रित येऊन घेतला. हा निर्णय घेतल्यामुळे आम्हाला मनस्वी आनंद झाला असल्याचं उपस्थित महिलांनी सांगितले.

कोल्हापूर जिल्हा त्याच्या पुरोगामी विचारांसाठी ओळखला जातो. छत्रपती राजर्षी शाहू महाराजांच्या या धर्तीवर असे अनेक निर्णय आजपर्यंत घेतले गेले आहेत. स्वतः शाहू महाराजांनी असे अनेक निर्णय घेतले आणि ते कोल्हापूरमध्ये लागू केले आणि एक आदर्श निर्माण केला. त्यांच्या पुरोगामी विचारांचा कोल्हापूरी जनतेवर इतका पगडा आहे की पुरोगामी आणि धाडसी निर्णय घेताना ते अजिबात कचरत नाहीत. असाच एक निर्णय कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळे तालूक्यातील हिरवाडे गावात विधवा प्रथा बंदीचा महत्वपूर्ण निर्णय घेतला गेला. असा निर्णय घेणारं हिरवाडे हे देशातील पहिलं गाव ठरलं आहे.

पतीच्या निधनानंतर कुंकू पुसणे, मंगलसुत्र काढणे, या पध्दती सदर निर्णयानंतर आता गावामध्ये बंद होणार आहेत. ग्रामपंचायतीच्या निर्णयानंतर गावातील महिलांनी आनंद व्यक्त करत या निर्णयाचं स्वागत केलं आहे. या निर्णयामुळे विधवा महिलांना गमावलेला स्वाभिमान परत मिळण्यास मदत होणार असल्याचं महिलांनी सांगितलं आहे.

Updated : 8 May 2022 6:58 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top