Home > News Update > मराठवाडा आणि विदर्भाला मुसळधार पावसाने झोडपले

मराठवाडा आणि विदर्भाला मुसळधार पावसाने झोडपले

मराठवाडा आणि विदर्भाला मुसळधार पावसाने झोडपले
X

नागपूर : हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार काल सायंकाळपासून मराठवाडा आणि विदर्भात मुसळधार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे नद्या नाले, ओढे तुडुंब भरून वाहत असून शेकडो गावांना याचा फटका बसला आहे. अनेक गावात पाणी शिरले असून मदत व बचावकार्य सुरू करण्यात आल्याची माहिती आहे.

दरम्यान बीड, परभणी, बुलडाणा, औरंगाबाद, अकोला, नांदेड जिल्ह्यांना जोरदार पावासाने झोडपले आहे. तर,तिकडे विदर्भातील उमरखेड येथे पुराच्या पाण्यात बस वाहून गेल्याची दुर्घटना समोर आली आहे.

उमरखेडच्या दहागांव येथील पुलावरून पाणी मोठ्या वाहत असल्याने पुलावरून वाहने घालू नये असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आली आहे. दरम्यान या पुलावरून जात असताना राज्य परिवहन महामंडळाची नाल्यात वाहून गेली. उमरखेड वरून पुसदकडे ही बस जात होती, या बसमधून चालक आणि वाहक यांच्यासह एकूण 5 प्रवासी प्रवास करत असल्याची प्राथमिक माहिती आहे .

Updated : 28 Sept 2021 11:25 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top