सातारा जिल्ह्यात पावसाने चांगलाच जोर धरला
X
सातारा // सातारा जिल्ह्यात पावसाने चांगलाच जोर धरल्याने नदी, नाले-ओढे तुडुंब भरून पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पडत असलेल्या संततधार पावसाने कोयना धरण पाणीपातळीत वाढ झाली आहे. धरणात 1 लाख 54 हजार क्यूसेक्स पाण्याची आवक सुरू आहे. सातारा जिल्ह्याला हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. महाबळेश्वर कोयना नवाजा या पर्जयन मापक यंत्रावर्ती महाबळेश्वर 556 मिलीमीटर , नवजा 240 मिलीमीटर, कोयना 201 मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे. तर धरणात 66 टिएमसी इतका पाणीसाठा झाला आहे.
नदीपात्रालगतचा गावांना सतर्कतेचा इशारा
पावसाचा जोर वाढत असल्याने कोयना नदीपात्रालगतचा गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. कोयना धरणातून कोयना नदीपात्रात 2100 क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग सोडण्यात आल्याने संगमनगर (धक्का) जुना पूल पाण्याखाली गेला आहे. तर पाटण शहरातून दक्षिणेकडे जाणारा मुळगाव पूल हा देखील पाण्याखाली गेल्याने नदीकाठच्या गावांची मोठी गैरसोय होत आहे. नदीकाठच्या गावांचा संपर्क तुटला आहे.
भात शेतीचे नुकसान,रस्ता वाहतुकीवर परिणाम
यंदा पावसाने भात शेतीचे मोठे नुकसान झाल्याचे पाहायला मिळत आहे. मुसळधार पावसामुळे कराड - चिपळूण राज्य महामार्ग बंद झाला आहे. कोयना नदीपत्रात संगम होणाऱ्या उपनद्या गोवारे, कापना नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. गोवरे नदीने जिल्हाअंतर्गत रस्ता बंद केला आहे तर तिकडे कापना नदीचे पाणी कराड - चिपळूण राज्यमहामार्गवर आल्याने वाहतूक बंद झाली आहे.
जिल्ह्यात (बुधवार) सरासरी एकूण 19.8 मिलीमीटर पाऊस पडला असून आत्तापर्यंत सरासरी 119.8 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.