रायगड जिल्ह्यात 3 दिवस अतिवृष्टी, प्रशासनाचे नागरिकांना सतर्कतेचे आदेश
X
रायगड जिल्ह्यात सातत्याने नैसर्गिक आपत्ती व आस्मानी संकटे येऊन धडकत आहेत. तौक्ते चक्रीवादळानंतर आता जिल्ह्यात तीन दिवस अतिवृष्टी होण्याचे इशारा हवामान खात्याने दिला आहे.
अतिवृष्टीमुळे दरड कोसळण्याची शक्यता असल्याने महाड,पोलादपूर, म्हसळा, श्रीवर्धन, तळा सुधागड, कर्जत येथील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे आदेश प्रशासनास देण्यात आले आहेत. त्यामुळे या नागरिकांना सुस्थळी हलविण्याची प्रक्रिया प्रशासनाकडून सुरू करण्यात आली आहे.
समुद्र, नदी, धरण वाहत्या पाण्यात जाण्यास बंदी अतिवृष्टीत मुसळधार पाऊस सुरू झाल्यानंतर नदी धरण, या ठिकाणी पाण्याचा प्रवाह वाढला जातो. तसेच समुद्राला भरती असली की समुद्र, खाडी किनारी भागात पाणी घुसले जाते. त्यामुळे पूरस्थिती निर्माण होते. अशावेळी तरुणाईने पोहण्यास जाऊ नये असे आवाहन प्रशासनाने केले आहे. तसेच समुद्र आणि खाडीकिनारी गावांना आणि नागरिकांना, प्रशासकीय यंत्रणांना सतर्क राहण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत.