मुसळधार पावसामुळे रायगड जिल्ह्यात अऩेक नद्यांना पूर, वाहतूक विस्कळीत
X
रायगड - रायगड जिल्ह्यात सलग मुसळधार पाऊस कोसळत आहे. बुधवारी अंबा नदीने धोक्याची पातळी ओलांडली. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. पावसाचा जोर वाढल्याने वाकण-पाली-खोपोली राष्ट्रीय महामार्गावरील पाली व जांभुळपाडा पुलावरून पाणी गेले. त्यामुळे दोन्ही बाजूची वाहतूक अनेक तास ठप्प झाली होती. खुरावलें आंबा नदीचा पाण्याचा प्रवाह वाढल्याने भैरव रस्ता रहदारीसाठी बंद करण्यात आला होता.
पाली अंबा नदी पुलाच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या लांब रांगा लागल्या होत्या. तसेच सकाळी कामावर निघालेले चाकरमानी, शेतकरी, व्यावसायिक यांना अडकून पडावे लागले. या ठिकाणी पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. या ठिकाणावरून येणाऱ्या प्रवाशांना पर्यायी मार्गाचा अवलंब करण्याच्या सूचना रायगड जिल्हा प्रशासनाने दिल्या होत्या. पाली व जांभुळ पाडा नवीन पुलाचे बांधकाम कधी पूर्ण होणार, आणि हा नेहमीचा त्रास कधी थांबणार असा सवाल नागरिकांनी विचारला आहे.
गेल्या तीन दिवसापासून मुसळधार पाउस सुरु आहे. त्यामुळे सखल भागात पाणी शिरले आहे. तर नद्या, नाले, दुथडी भरुन वाहत आहेत. येथील गावांना जोडणार्याआ पुलांवरुन पाणी वाहत असल्याने वाहतुकीला अडसर निर्माण झाल्याचे दिसून आले. रस्त्याच्या दुतर्फा असलेली झाडे उन्मळून पडत आहेत. तर भुस्खलनाने दरड कोसळण्याचा धोका वाढला आहे. हवामानखात्याने वर्तविलेल्या अंदाजाप्रमाणे पावसाचा जोर वाढत आहे. अशातच जंगल आणि अधिक पर्जनवृष्टीचा तालुका म्हणून ओळखला जाणार्याा सुधागडमध्ये पावसाने जोर कायम आहे.
पाली व जांभुळपाडा आंबा नदी पुल वाहतूक व प्रवासाच्या दृष्टीने महत्वाची आहे.य मुसळधार पाऊस असल्याने पाली अंबा नदी पुलावरून पाणी गेले. पावसाचा जोर वाढत आहे. त्यामुळे नागरीकांनी कामाशिवाय घराबाहेर पडू नये व अधिक सतर्क राहावे, असे आवाहन पाली सुधागडचे तहसीलदार दिलीप रायन्नावर यांनी केला आहे.