Home > News Update > नाशिक जिल्ह्यातील धरण क्षेत्रात जोरदार पाऊस

नाशिक जिल्ह्यातील धरण क्षेत्रात जोरदार पाऊस

नाशिक जिल्ह्यातील धरण क्षेत्रात पावसाची संततधार सुरू असल्याने धरणाच्या पाणी साठ्यात मोठी वाढ होताना दिसत आहे. नाशिक जिल्ह्यातील धरणाचा जलसाठा 27 टक्क्यांवरून 40 टक्क्यांवर पोहचल्याची माहीती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

नाशिक जिल्ह्यातील धरण क्षेत्रात जोरदार पाऊस
X

गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार सुरु असल्याने आज सकाळी (23 जुलै) ला गंगापूर धरण 58 टक्के भरले आहे. सततच्या पावसामुळे नाशिक जिल्ह्यातील धरणाचा जलसाठा 27 टक्क्यांवरून 40 टक्क्यांवर पोहोचल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. गंगापूर धरणसमूहातील धरणांच्या पाणीपातळीतही वाढ वाढ झाल्याने एकूण जलसाठा आता 47 टक्क्यांवर पोहोचला आहे.

पावसाच्या संततधार सुरू असल्याने धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ

सध्या कश्यपी धरणात 31 टक्के, तर गौतमी गोदावरीमध्ये 32 व आळंदी धरणात 41 टक्के जलसाठा झाला आहे. तर तिकडे पालखेड धरणसमूहाच्या पाणलोट क्षेत्रात देखील संततधार सुरू असल्याने धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ झाली असून, पालखेड धरण 32 टक्के भरले आहे, तर करंजवन 9 टक्के, वाघाड 24 टक्के भरले आहे. तर ओझरखेड 26 टक्के, पुणेगाव 7 टक्के आणि तिसगाव 1 टक्का भरलं आहे.

तिकडे मोठा प्रकल्प असलेले दारणा 87 टक्के भरले आहे, भावली 92 टक्के तर मुकणे धरण 39 टक्के भरल्याची माहिती धरण प्रशासनाकडून देण्यात आली आहे. वालदेवी प्रकल्पात 81 टक्के तर कडवा 26 टक्के भरले आहे. नांदूरमध्यमेश्वर पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू असल्याने नांदूरमध्यमेश्वर प्रकल्प 100 टक्के भरला आहे. त्यामुळे नांदूरमध्यमेश्वरमधून गोदावरी नदीत 202 क्युसेसने विसर्ग सुरू करण्यात आला आहे. याच धरणसमूहातील भोजपूर धरणा 14 टक्के भरले आहे.

यानंतर गिरणा खोरे धरण समूहातील चणकापूर 14 टक्क्यांवर असून, हरणबारी धरण 43 टक्के भरले आहे. केळझर धरण 20 टक्के असून नागसाक्या अजनूही शून्य टक्क्यांवरच असल्याची माहिती आहे.

तिकडे खानदेशचे गिरणा धरण 37 टक्के भरले आहे. तर पुनद 28 टक्के आणि माणिकपुंज प्रकल्पात 41 टक्के जलसाठा झाला आहे.

Updated : 23 July 2021 3:15 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top