Home > News Update > बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, ट्रॅक्टरसह जीप गेली वाहून

बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, ट्रॅक्टरसह जीप गेली वाहून

बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, ट्रॅक्टरसह जीप गेली वाहून
X

कोरोनाच्या संकटात बीडमध्ये आणखी एक संकट उभं राहिलं आहे. बीडच्या धारूर तालुक्यातील अनेक भागात आज झालेल्या अवकाळी मुसळधार पाऊसाने नद्याला पूर आला आहे. यामुळं तालुक्यातील आवरगाव, पांगरी, हसनाबाद, भोगलवाडी, थेटेगव्हाण येथील नद्यांना पूर आला आहे.

या अवकाळी पावसाने नद्या, नाल्या, ओढे हे दुथडी भरून वाहत आहेत. वादळी वादऱ्यासह झालेल्या जोरदार पावसाने आंबा, डाळिंब, मोसंबी, टरबूज, खरबूज, कांदा, फळभाज्या सह पिकांचं मोठं नुकसान झालं असून एका ट्रॅक्टरसह जीप देखील पुरामध्ये वाहून गेली आहे.

यावेळी अनेकांच्या घरांवरील पत्रे देखील उडाले असून मात्र, सुदैवाने यात कोणतीही जीवीत हानी झाली नाही. दरम्यान उन्हाच्या कडक पाहऱ्यात झालेल्या जोरदार पावसाने लोकांच्या मनात भीतीचं वातावरण आहे.

Updated : 9 May 2021 7:25 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top