सामाजिक द्वेषाच्या अजेंड्याला हिंदू- मुस्लिम बांधवांचे एकीने उत्तर
X
एकीकडे देशात धार्मिक तणावाचं वातावरण निर्माण करणाऱ्या घटना घडत आहेत, तर दुसरीकडे या सामाजिक द्वेषाच्या अजेंड्याला उत्तर देण्यासाठी सर्वसामान्य लोकांनीच आता पुढाकार घेतल्यास दिसते आहे.
प्रति पंढरपूर म्हणून प्रसिद्ध असलेल्या औरंगाबाद जिल्ह्यातील पंढरपूर मधल्या हिंदू आणि मुस्लिम बांधवांनी सामाजिक एकोप्याचं दर्शन घडवणारा मोठा निर्णय घेतला आहे. आषाढी एकादशी आणि बकरी ईद एकाच दिवशी आल्याने दोन दिवस मांसविक्री बंद ठेवण्यात येणार आहे. एवढेच नाही तर आषाढीमुळे बकरी ईदला कुर्बानी न देण्याचा अनोखा निर्णयसुध्दा घेतला आहे.
१० जुलै ला हिंदू आणि मुस्लिम बांधवांनी दोन्ही उत्सव एकत्रित साजरे करण्याचा निर्धार केला आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पंढरपुरातील मुस्लिम बांधवांनी श्री. विठ्ठल-रुक्मिणी मंदिर संस्थान कमिटीच्या वतीने आयोजित केलेल्या बैठकीत बकरी ईदला कुर्बानी न देण्याचा एकमताने निर्णय घेतला. मुस्लिम बांधवांच्या निर्णयाचे जिल्ह्यात कौतुक होत असून औरंगाबाद जिल्ह्यातील प्रती पंढरपुरात हिंदू-मुस्लीम एकोप्याचे अनोखे दर्शन घडत आहे.