Home > News Update > कडक शिस्तीच्या अधिकाऱ्यांच्यांच होतात बदल्या...

कडक शिस्तीच्या अधिकाऱ्यांच्यांच होतात बदल्या...

कडक शिस्तीच्या अधिकाऱ्यांच्यांच होतात बदल्या...
X

महाराष्ट्रात नेहमी चर्चेत राहणारे सनदी अधिकारी म्हणजे तुकाराम मुंडे...त्याचप्रमाणे हरियाणामध्ये सुद्धा नेहमी चर्चेत राहणारं एक नाव आहे ते म्हणजे सनदी अधिकारी अशोक खेमका...गेल्या ३० वर्षात अशोक खेमका यांची ५५ वेळा बदली झाली आहे. खेमका यांनी आता मुख्य सचिव म्हणून अभिलेखागार विभागात पाठविण्यात आले आहे. तर महाराष्ट्रात तुकाराम मुंडे यांची सतत बदली होत असल्यामुळे त्याचे नाव महाराष्ट्रात सध्या सर्वांना परिचयाचे झाले आहे. मुंडे यांच्या पेक्षाही खेमका यांची अधिक वेळा बदली झाली आहे. खेमका यांच्याप्रमाणात मुंडे यांच्या बदल्या काहीच नसल्याचे बोलले जाते. मुंडे यांच्याप्रमाणे खेमका हे देखील हरियाणामध्ये कडक शिस्तीसाठी ओळखले जातात.

इंडीयन नॅशनल लोक दल सरकारच्या काळात खेमका यांची पाच वर्षाच्या कालावधीत तब्बल ९ वेळा बदली करण्यात आली आहे. एकदा तर त्यांना राज्य सरकारकडून देण्यात आलेली सरकारी गाडी सुद्धा काढून घेण्यात आली होती तरी खेमका डगमगले नाही. खेमका यांची सरकारी गाडी काढून घेतल्यानंतरही अशोक खेमका हे घरापासून दररोज कार्यालयापर्यत पायी ये-जा करत होते.

अशोक खेमका हे प्रशासकीय सेवेत येण्याअगोदर त्यांनी आयआयटी खरगपूर येथून १९८८ मध्ये कंम्प्यूटर सायन्स आणि इंजिनिअरिंगमध्ये टॉपर केले आहे. ते १९९९ च्या बॅचचे सनदी अधिकारी आहेत. तर दुसरीकडे तुकाराम मुंडे हे २००५ साली प्रशासकीय सेवेत रुजू झाले आहेत. राज्यातील सनदी अधिकारी तुकाराम मुंडे हे त्यांच्या बदल्यांमुळे नेहमी चर्चेत राहिलेले आहेत. त्यांची १६ वर्षात २० वेळा बदली झाली आहे. मुंडे यांची जिथे जिथे बदली झाली तिथे तिथे त्यांनी आपल्या कामाची छाप सोडली आहे. आणि मुंडे हे आपल्या कामासाठी राज्यभरात प्रसिद्ध आहेत. मुंडे यांच्या कामाची शैली सामान्य लोकांमध्ये प्रसिद्ध आहे. त्यामुळे त्याच्यापासून कर्मचारी आणि सत्ताधारी दोन हात लांब राहणेच पसंद करतात.

Updated : 10 Jan 2023 8:42 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top