अपंगत्वावर मात करत सुरु केला भंगार व्यवसाय...
X
आपल्या अपंगत्वावर मात करत व्यवसाय सुरु करणं आणि तोही भंगारचा व्यवसाय असेल तर जरा नवलचं नाही का...वर्धातील राजू शेख यांने आपल्या अपंगत्वावर मात करत भंगारचा व्यवसाय सुरु केला आणि त्या व्यवसायाच्या जीवावर राजू आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहे.
आपल्याला जन्मजात असलेल्या अपंगत्वाचा कोणताही बाऊ न करता, त्या अपंगत्वाकडे सकारात्मक दृष्टीने पाहणाऱ्या वर्ध्यातील एका भंगार व्यावसायिकाची ही आहे जीवनकहाणी...आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्याासाठी अहोरात्रपणे काम करणारे हे आहेत राजू शेख...ते दररोज आजूबाजूच्या गावात जावून परिसरातील भंगार सामानाची खरेदी करतात. यासाठी ते आपल्या तीनचाकी रिक्षाचा वापर करतात. आणि पेपरची रद्दी, जुनी पुस्तके, लोखंड, प्लास्टिकच्या वस्तू गोळा करतात. आणि त्या मुख्य बाजारात आणून मोठ्या भंगार विक्रेत्याला विकतात आणि त्यातून जो नफा मिळतो त्यावर आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह राजू शेख करतात.
राजू शेख यांनी घरकुल योजनेसाठी फॉर्म भरलेला आहे. मात्र तो अद्यापही जमा झालेला नाही. त्यातच जर काम केले नाही तर कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करणार हा प्रश्न राजू समोर आवासून उभा होता. त्याचा विचार करत घरात बसण्यापेक्षा आपल्या अपंगत्वाचा विचार न करता राजू शेख याने भंगारचा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला आणि राजूने आता त्याला आपला मुख्य व्यवसाय बनवला. अशी आहे राजू शेखची ही कहाणी...अपंगत्वाचा कोणताही बाजार न मांडता त्याला जिद्दीने आणि मेहतीने यशात रुपांतर करण्याचा हा राजूचा छोटासा प्रयत्न...राजूच्या या प्रयत्नाला मॅक्स महाराष्ट्रचा सलाम...