Home > News Update > एकनाथ खडसेंचे अपंगत्वाचे प्रमाणपत्र वादाच्या भोवऱ्यात, दिव्यांगांचा मोर्चा

एकनाथ खडसेंचे अपंगत्वाचे प्रमाणपत्र वादाच्या भोवऱ्यात, दिव्यांगांचा मोर्चा

एकनाथ खडसेंचे अपंगत्वाचे प्रमाणपत्र वादाच्या भोवऱ्यात, दिव्यांगांचा मोर्चा
X

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांचे अपंगत्वाचे प्रमाणपत्र वादाच्या भोवऱ्यात सापडलं आहे. दिव्यांगांना प्रमाणपत्र मिळवण्यासाठी मोठया दिव्य परिस्थितीतून जावं लागतं, मात्र खडसेंना 60 टक्के अपंगत्वाचे प्रमाणपत्र कसे मिळाले याची चौकशी करावी यासाठी काही अपंग संघटनांनी जिल्हाधिकारी कार्यालयात मोर्चा काढून चौकशीची मागणी केली आहे.

खडसे यांनी बनावट अपंगत्व प्रमाणपत्र मिळवले असून, हा आमच्या हक्कावर गदा आणण्याचा प्रकार असल्याचा आरोप केला दिव्यांगांनी केला आहे. याविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयात आंदोलन करून निवेदन देण्यात आले.



अपंग बांधव अपंगत्वाच्या प्रमाणपत्रासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयाचे खेटे घालत असताना आम्हाला प्रमाणपत्र मिळत नाही, त्याउलट एकनाथ खडसेंनी अर्ज करताच त्यांना 60 टक्के अपंगत्वाचे प्रमाणपत्र कसे मिळाले, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.

राज्य सरकारने चौकशी करावी – शिवसेना

कोणत्या आधारावर खडसेंना 60 टक्के अपंगत्वाचे प्रमाणपत्र देण्यात आले असा प्रश्न उपस्थित करत शिवसेनेचे माजी जळगाव महानगरप्रमुख गजानन मालपुरे यांनीही एकनाथ खडसे यांच्या अपंगत्वाच्या प्रमाणपत्राची चौकशीची मागणी केली आहे. जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडे माहिती अधिकारात खडसेंच्या अपंगत्व प्रमाणपत्राबाबत सविस्तर माहिती मागवण्यात आली आहे. त्यात खडसेंची वैद्यकीय तपासणी करणाऱ्या डॉक्टर्सचीही माहिती मागवली आहे. सोबतच खडसेंची ज्या दिवशी वैद्यकीय तपासणी झाली, त्या दिवसाचे रुग्णालयातील आवाराचे सीसीटीव्ही फुटेजही त्यांनी मागितले आहे.

Updated : 6 Oct 2021 8:00 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top