Home > News Update > Singhu Border वर तरुणाची हत्या, आंदोलकांच्या स्टेजजवळ हात कापून बॅरिकेटला लटकवलं

Singhu Border वर तरुणाची हत्या, आंदोलकांच्या स्टेजजवळ हात कापून बॅरिकेटला लटकवलं

Singhu Border वर तरुणाची हत्या, आंदोलकांच्या स्टेजजवळ हात कापून बॅरिकेटला लटकवलं
X

दिल्लीच्या सिंघू बॉर्डरवर सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनात एका तरुणाची हत्या करण्यात आल्याचं समोर आलं आहे. मारलेल्या युवकावर शिखांचा धर्मग्रंथ गुरु ग्रंथ साहिब शी छेडछाड केल्याचा आरोप आहे. शेतकरी आंदोलनाच्या ठिकाणी लावण्यात आलेल्या बॅरिकेड वर युवकाचा मृतदेह आढळला आहे.

या युवकाला वाईट पद्धतीने मारण्यात आल्याचं मृतदेहावरून स्पष्ट होत असल्याचं दिसून येतंय. मृत तरुणाची ओळख पटली आहे. त्याचे नाव लखबीर सिंह असून तो पंजाबमधील तरनतारनचा रहिवासी होता. 35 वर्षांचा हा तरुण मजूर म्हणून काम करत होता. मिळालेल्या माहितीनुसार, स्टेजजवळ नेऊन त्याची हत्या करण्यात आली आहे.

लखबीर सिंहला हरनाम सिंहने 6 महिन्यांचा असताना दत्तक घेतले होते. लखबीरचे जैविक वडील दर्शन सिंह असून त्यांचे निधन झाले आहे. कुटुंबात एक विधवा बहीण आहे. त्याची कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही. मिळालेल्या माहितीनुसार या घटनेचा एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यात एक गट त्या माणसावर चढताना दिसत आहे.

व्हिडीओमध्ये काही लोक भाले घेऊन, त्या माणसाभोवती उभे राहून त्याला त्याचे नाव आणि मूळ गाव विचारत आहेत. व्हिडिओमध्ये दिसत आहे की जखमी व्यक्ती मदतीसाठी याचना करत आहे मात्र, कोणीही पुढे येत नाही.

हत्येपूर्वी त्याला मारहाण करून ओढण्यात आल्याचे चित्रातून स्पष्ट होत आहे. मृतदेहाचे दोन्ही हात बॅरिकेड्स बांधलेले आहेत. सोनीपत पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला आहे. शुक्रवारी सकाळी आंदोलक शेतकऱ्यांच्या मुख्य स्टेजच्या मागे मृतदेह सापडला. माहिती मिळताच पोलीस तेथे पोहचले मात्र, त्यांना विरोधाला सामोरे जावे लागले, परंतु हस्तक्षेपानंतर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला.

या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात लोकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या घटनेनंतर संयुक्त किसान मोर्चाने दुपारी 12 वाजता बैठक बोलावली आहे. असे मानले जाते की, त्यानंतर मोर्चा निवेदन जारी करू शकतो. केंद्र सरकारने नवीन कृषी कायद्यांचा निषेध करण्यासाठी शेतकरी एक वर्षाहून अधिक काळ सिंघू बॉर्डरवर आंदोलन करत आहेत.

Updated : 15 Oct 2021 12:28 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top