Home > News Update > आरोग्य विभागाच्या गट क व गट ड पदाची परीक्षा रद्द

आरोग्य विभागाच्या गट क व गट ड पदाची परीक्षा रद्द

आरोग्य विभागाच्या गट क व गट ड पदाची परीक्षा रद्द
X

मुंबई : राज्यात आज आणि उद्या आरोग्य विभागाच्या गट क व गट ड पदाची परीक्षा घेतली जाणार होती. पण ही परीक्षा रद्द करण्यात आली आहे. काल रात्री नऊ वाजता राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी याबाबत माहिती दिली. दरम्यान परीक्षा ऐनवेळी रद्द झाल्यामुळे विद्यार्थ्यांना झालेल्या त्रासाबद्दल मी माफी मागतो, अशी प्रतिक्रिया आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

SET ची परीक्षा आणि आरोग्य विभागाची परीक्षा ही एकच दिवशी येणार होती त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना कोणत्यातरी एका परीक्षेलाच उपस्थित राहाता येणार होते, त्यामुळे काही विद्यार्थ्यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. मात्र दुसरीकडे

अनेक विद्यार्थी हे खबरदारी म्हणून आधीच परीक्षा केंद्रावर पोहोचले असल्याने शासनाने घेतलेल्या या निर्णयामुळे त्यांनी संताप व्यक्त केला आहे. तर परीक्षा केंद्राबाबत झालेल्या घोळमुळे परीक्षा पुढे ढकलण्याचा झालेला निर्णय योग्यच असल्याचे मत काही विद्यार्थ्यांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी काल आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली होती आणि परीक्षा केंद्रांवर पाहणी करून कुठल्याही परीक्षार्थींची गैरसोय होऊ देणार नसल्याचं त्यांनी सांगितलं होतं. यावेळी आरोग्यमंत्री टोपे म्हणाले की, "केवळ एका विद्यार्थ्याच्या हॉल तिकीटावर परीक्षा केंद्राचा पत्ता चुकला होता, तो तात्काळ दुरुस्त करण्यात आला आहे. जवळपास आठ लाख विद्यार्थी या परीक्षेसाठी बसत आहेत, त्याच्या नियोजनासाठी बाह्य स्त्रोत नेमण्यात आला आहे. आरोग्य विभागाच्या परीक्षेची सर्व तयारी झाली असल्याचं खुद्द आरोग्य मंत्र्यांनी स्पष्ट केले असतांना काही तासातच ही परीक्षा रद्द करण्याची नामुष्की राज्य सरकारवर आली आहे.

Updated : 25 Sep 2021 2:35 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top