बीड येथे मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनी हुतात्म्यांना अभिवादन
X
बीड : 74 वा मराठवाडा मुक्ती संग्राम दिन बीड मध्ये मोठ्या उत्साहात पार पडला. जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी शहरातील हुतात्मा चौकात अभिवादन करून ध्वजारोहण केले. दरम्यान यावेळी स्वातंत्र्य सैनिक आणि त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते. पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधींनी हुतात्म्यांना याप्रसंगी अभिवादन केले. तर पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर मुख्य ध्वजारोहण पार पडला. दरम्यान सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी तत्कालीन फडणवीस सरकारवर निशाणा साधलाय, फडणवीस सरकारने फक्त घोषणा केल्या एकाची ही अंमलबजावणी केली नाही. मराठवाड्याच्या तोंडाला नेहमीच पान पुसली मात्र, आम्ही मराठवाड्याच्या जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचं यावेळी धनंजय मुंडेंनी म्हटलं आहे.
सोबतच यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी येत्या काळात बीड जिल्ह्यातील शैक्षणिक सुविधा जास्तीत जास्त चांगल्या कशा होतील यासाठी आमच्या सरकारचा प्रयत्न असेल असे म्हटले आहे.