Home > News Update > ग्रामपंचायत निवडणूक : ऑनलाईन अर्ज करू न शकलेल्या उमेदवारांना मोठा दिलासा

ग्रामपंचायत निवडणूक : ऑनलाईन अर्ज करू न शकलेल्या उमेदवारांना मोठा दिलासा

ग्रामपंचायत निवडणूक : ऑनलाईन अर्ज करू न शकलेल्या  उमेदवारांना मोठा दिलासा
X

राज्यात ग्रामपंचायत निवडणूक प्रक्रिया सुरु आहे. या प्रक्रियेमध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारले जात होते. पण या प्रक्रियेत अनेक उमेदवारांना अर्ज भरताना अडचणींचा सामना करावा लागत होता. सर्व्हर डाऊन असल्याने अनेक अर्ज जमा होत नव्हते. परिणामी अर्जांची संख्या कमी होत होती. सांगली जिल्ह्यातील विटा खानापूर तालुक्यात चौथ्या दिवसापर्यंत केवळ २४८ अर्ज जमा झाले होते. एक हजाराच्या आसपास अर्ज येणे अपेक्षित होते. उद्या हि मुदत संपत आहे.


या प्रक्रियेमुळे अनेक उमेदवारांना उमेदवारी पासून वंचित राहावे लागणार होते. या सर्व उमेदवारांना दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. यासंदर्भात ऑफलाईन पद्धतीने अर्ज घेण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. अर्ज स्वीकारण्याची वेळ देखील उद्या सायंकाळी ५.४५ करण्यात आली आहे. यासंदर्भात सांगली जिल्ह्यातील खानापूर विटा तहसीलदार ऋषिकेश शेळके यांनी मॅक्स महाराष्ट्रासोबत बोलताना ही माहिती दिली आहे. या निर्णयामुळे इच्छुक उमेदवारांना मोठा दिलासा मिळणार आहे.


राज्य निवडणूक आयुक्त यू.पी. एस. मदान यांनी सांगितले की, राज्य निवडणूक आयोगाने 9 नोव्हेंबर 2022 रोजी राज्यातील 7 हजार 751 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा केली होती. त्यानुसार दि.28 नोव्हेंबर 2022 ते 2 डिसेंबर 2022 (दुपारी 3 वाजेपर्यंत) या कालावधीत संगणक प्रणालीद्वारे नामनिर्देशनत्र सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यात आता अंशत: दुरूस्ती करून नामनिर्देशनपत्र पारंपरिक (ऑफलाईन) पद्धतीने 2 डिसेंबर 2022 रोजी सायंकाळी 5.30 पर्यंत सादर करता येतील.

Updated : 1 Dec 2022 1:04 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top