Grampanchayat Election : ग्रामपंचायत निवडणूकांची रणधुमाळी, रिक्त पदांसाठी कार्यक्रम जाहीर
राज्यात पुन्हा ग्रामपंचायत निवडणूकांचा बिगूल वाजला आहे. याणध्ये राजीनामा, निधन, अनहर्ता किंवा इतर कारणांमुळे रिक्त झालेल्या पदांसाठी पुन्हा निवडणूक आयोगाने निवडणूकीची घोषणा केली आहे.
X
Grampanchayat Election : राज्यातील सुमारे 2 हजार 620 ग्रामपंचायतीतील 3 हजार 666 सदस्य आणि 126 थेट सरपंच पदाच्या पोटनिवडणूकांसाठी (Grampanchayat bypoll election) 18 मे 2023 रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे.
राज्यातील ज्या ग्रामपंचायतीतील सदस्य अथवा सरपंचांचे निधन, राजीनामा किंवा इतर कारणांमुळे सदस्यत्व रद्द झाले असेल. तर त्या रिक्त झालेल्या जागांवर पोटनिवडणूक होणार आहे. त्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम (Election program) जाहीर केला आहे. या पोटनिवडणूकीसाठी 25 एप्रिल ते 2 मे या कालावधीत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. मात्र दरम्यान येणाऱ्या सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी उमेदवारी अर्ज दाखल करता येणार नाही.
उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर नामनिर्देशनपत्रांची 3 मे रोजी छाणणी होईल. त्यानंतर 8 मे पर्यंत नामनिर्देशनपत्र मागे घेता येईल. त्याबरोबरच नामनिर्देशनपत्र मागे घेण्याच्या दिवशीच चिन्हांचे वाटप करण्यात येईल. यानंतर 18 मे रोजी सकाळी 7.30 ते सायं. 5.30 या वेळेत मतदान होईल. मात्र नक्षलग्रस्त व दुर्गम भागात दुपारी 3 वाजेपर्यंतच मतदानाची वेळ असेल. त्यानंतर 19 मे रोजी मतमोजणी होणार आहे.