Home > News Update > ग्रामपंचायत निवडणूकांच्या ऑनलाईन अर्जावर ऑफलाईनचा उतारा, राज्य निवडणूक आयुक्तांचा निर्णय

ग्रामपंचायत निवडणूकांच्या ऑनलाईन अर्जावर ऑफलाईनचा उतारा, राज्य निवडणूक आयुक्तांचा निर्णय

ग्रामपंचायत निवडणूकांच्या ऑनलाईन अर्जावर ऑफलाईनचा उतारा, राज्य निवडणूक आयुक्तांचा निर्णय
X

राज्यात ग्रामपंचायत निवडणूकांचा बिगूल वाजला आहे. त्यातच निवडणूक आयोगाने ऑनलाईन नामनिर्देशनपत्र सादर करण्यास सांगितले होते. मात्र ऑनलाईन नामनिर्देशनपत्र सादर करतांना वेगवेगळ्या अडचणी येत असल्याच्या तक्रारी राज्यभरातून करण्यात आल्या. त्यानंतर अखेर राज्य निवडणूक आयुक्तांनी मोठा निर्णय घेतला आहे.

विविध जिल्ह्यांतील ग्रामपंचायतींच्या सदस्यपदांसह थेट सरपंचपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी पारंपरिक पद्धतीने (ऑफलाईन) नामनिर्देशनपत्र सादर करण्याची मुभा देण्यात आली आहे. तसेच नामनिर्देशनपत्र सादर करण्याची मुदत 2 डिसेंबर 2022 रोजी सायंकाळी 5.30 पर्यंत वाढविण्यात आली आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू.पी. एस. मदान यांनी आज येथे दिली.

मदान यांनी सांगितले की, राज्य निवडणूक आयोगाने 9 नोव्हेंबर 2022 रोजी राज्यातील 7 हजार 751 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा केली होती. त्यानुसार 28 नोव्हेंबर 2022 ते 2 डिसेंबर 2022 (दुपारी 3 वाजेपर्यंत) या कालावधीत संगणक प्रणालीद्वारे नामनिर्देशनत्र सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यात आता अंशत: दुरूस्ती करून नामनिर्देशनपत्र पारंपरिक ऑफलाईन पद्धतीने 2 डिसेंबर 2022 रोजी सायंकाळी 5.30 पर्यंत सादर करता येतील.

Updated : 2 Dec 2022 9:59 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top