Home > Election 2020 > सत्तास्थापनेसाठी राज्यपालांचे शिवसेनेला निमंत्रण; उद्या संध्याकाळी ७ पर्यंतची वेळ

सत्तास्थापनेसाठी राज्यपालांचे शिवसेनेला निमंत्रण; उद्या संध्याकाळी ७ पर्यंतची वेळ

सत्तास्थापनेसाठी राज्यपालांचे शिवसेनेला निमंत्रण; उद्या संध्याकाळी ७ पर्यंतची वेळ
X

राज्यातला सर्वात मोठा पक्ष भाजपने सत्ता स्थापन करण्यासाठी असमर्थता दाखवल्यानंतर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी दुसरा मोठा पक्ष शिवसेनेला सत्ता स्थापन करण्यासाठी आमंत्रण दिलं आहे. राज्यपालांनी उद्या संध्याकाळी ७ वाजेपर्यंत शिवसेनेला सत्ता स्थापनेचा दावा करण्यासाठी वेळ दिला आहे.

यामुळे पुन्हा एकदा राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राज्यात शिवसेनेचाच मुख्यमंत्री होणार असा वारंवार पुनरुच्चार सेनेचे नेते करत आहेत. त्यामुळे आता सत्तेवर दावा करण्याची अधिकृत संधी शिवसेनेला चालून आली आहे.

शिवसेनेकडे बहुमतासाठी पुरेसं संख्याबळ नाही. त्यासाठी सेनेला राष्ट्रवादी आणि काँग्रेस दोन्ही पक्षांनी साथ घ्यावी लागणार आहे. सेनेला राष्ट्रवादीचा पाठिंबा हवा असल्यास त्यांनी एनडीएतून बाहेर पडावं आणि केंद्रातील मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी राष्ट्रवादीकडून करण्यात आली आहे.

Updated : 10 Nov 2019 8:28 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top