प्रक्षोभानंतर राज्यपालांची सारवासारव... म्हटले मी बघेन
छत्रपती शिवाजी महाराजांबाबत बदनामकारक वक्तव्य करुन अडचणीत आलेले राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आता सारसारव करत मला जितका इतिहास माहीती होता त्यावर बोललो.. नवी तथ्य समोर आले तर मी बघेन असं उत्तर दिलं आहे.
X
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर राज्यात प्रक्षोभ उडाला आहे. राज्यपालांच्या वक्तव्यावरून राष्ट्रवादीकडून आक्रमक भूमिका घेत विविध ठिकाणी निदर्शने केली जात आहेत. अशातच जळगाव दौर्यावर असलेले राज्यपाल कोश्यारी यांना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न केला.
राज्यपालांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध करण्यासाठी जळगावात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून काळे झेंडे दाखवले. आकाशवाणी चौकात आंदोलनासाठी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते जमले होते. मात्र आंदोलनापूर्वीच अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. करत छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्राचे प्रेरणास्त्रोत आहेत , सुरवातीच्या काळात समर्थ रामदास शिवाजी महाराज यांचे गुरू आहे अस वाचलं होत मात्र इतिहासकारांच्या काही नवीन तथ्य आहेत ते मी पाहिलं अस स्पष्टीकरण राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी दिलं आहे.
रविवारी औरंगाबाद शहरातील तापडिया नाट्यमंदिरात समर्थ साहित्य परिषदेचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून राज्यपाल कोश्यारी हे उपस्थित होते. या कार्यक्रमात गुरूचं महत्व सांगताना भगतसिंह कोश्यारी म्हणाले की, 'समर्थ रामदास नसते तर शिवाजी महाराज काय असते? समर्थ नसते तर शिवाजी महाराजही नसते, असं वादग्रस्त वक्तव्य केलं.
राज्यपालांच्या वक्तव्यानंतर राज्यभरातील शिवप्रेमींकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. तसंच विविध राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांनीही राज्यपाल कोश्यारी यांच्या वक्तव्यावर आक्षेप घेत माफी मागण्याची मागणी केली आहे.
कोश्यारी यांनी या वादावर खुलासा करताना जितका मला इतिहास माहित होता, त्यावर मी बोललो. आता नवीन काही तत्थ्य माझ्या समोर आणण्यात आले आहेत, त्याकडे मी बघेन असं उत्तर दिलं आहे.