राज्यपालांनी काढला महिलेचा मास्क, कोरोना नियमांचा भंग
X
विविध विधानांमुळे चर्चेत राहणारे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी सध्या आणखी एका वादात अडकण्याची शक्यता आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे पुण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या ऐका सायकल रॅलीच्या उदघाटनासाठी आले होते. यादरम्यान त्यांनी फोटो काढण्यासाठी आलेल्या एका महिलेचा मास्क हा स्वतःच्या हाताने खाली घेतला. या प्रसंगानंतर व्यासपीठावर एकच हशा झाला होता.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते शिवाजी महाराज पुतळा ते बालगंधर्व मंदिर पर्यंत 'पुणे ऑन पेडल्स' सायकल रॅलीचे उद्घाटन हिरवा झेंडा दाखवून करण्यात आले. या कार्यक्रमात सहभागी झालेल्या महिला सायकलस्वारांचा सत्कार राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते करण्यात आला. यादरम्यान एका महिलेचा राज्यपाल सत्कार करत होते आणि या दरम्यान फोटो काढत असताना राज्यपालांनी त्या महिलेच्या तोंडावरील मास्क हा स्वतःच्या हाताने खाली घेतला. त्यानंतर व्यासपीठावर उपस्थित सर्वजण हसू लागले. पण एकीकडे सरकार हे कोरोनाच्या नियमांचे पालन करण्याचे आव्हान वारंवार करत असताना स्वतः राज्यपालांनी अशाप्रकारे एका महिलेचे मास्क फोटो काढण्यासाठी खाली घेतल्याने नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.