जि.प.शाळांमधील शिक्षकांच्या बदल्यांबाबत सरकारचा निर्णय
X
राज्यातील जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत आणि आंतरजिल्हा बदल्या राज्य सरकारच्या धोरणानुसार १५ टक्के मर्यादेपर्यंत करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली आहे.
आंतरजिल्हा बदल्या ह्या ऑनलाईन पद्धतीने तर जिल्ह्यांतर्गत बदल्या ह्या ऑफलाईन पद्धतीने करण्यात येणार आहेत.
कोविड १९ च्या प्रादुर्भावामुळे या वर्षी जिल्ह्यांतर्गत बदल्या ह्या सामान्य प्रशासन विभागाच्या ७ जुलै २०२० रोजीच्या जीआरमध्ये दिलेल्या मुदतीनुसार ऑनलाईन पद्धतीने करणे शक्य नसल्याने जिल्हांतर्गत बदल्या सध्या ऑफलाईन पद्धतीने करण्यात येणार आहेत.
त्यामुळे जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदलीसाठीची प्रक्रिया यापूर्वी सुरु केली असून त्या अनुषंगाने शिक्षकांनी ऑनलाईन अर्ज दाखल केलेले आहेत. त्यामुळे आंतरजिल्हा बदल्या ह्या सध्याच्या धोरणानुसार ऑनलाईन पद्धतीने करण्यात येणार आहेत.
दरम्यान, जिल्हा परिषदेतील वर्ग ३ आणि ४ मधील इतर संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या बदल्याही १५ टक्क्यांच्या मर्यादेत करण्याबाबत सूचना देण्यात आल्याची माहितीही मंत्री श्री.मुश्रीफ यांनी दिली आहे.