Home > News Update > दिल्ली आंदोलन : शेतकऱ्यांच्या दोन मागण्या मान्य, पुढची चर्चा ४ जानेवारीला

दिल्ली आंदोलन : शेतकऱ्यांच्या दोन मागण्या मान्य, पुढची चर्चा ४ जानेवारीला

दिल्लीतील शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सरकार आणि शेतकऱ्यांमध्ये सुरू असलेल्या चर्चेमध्ये महत्त्वाची घडामोड झाली आहे.

दिल्ली आंदोलन : शेतकऱ्यांच्या दोन मागण्या मान्य, पुढची चर्चा ४ जानेवारीला
X

दिल्लीत सरकार आणि शेतकऱ्यांमध्ये सुरू असलेल्या चर्चेची सहावी फेरी थोड्याच वेळापूर्वी पार पडली आहे. या बैठकीतून एक सकारात्मक बातमी आली आहे आणि ती म्हणजे या बैठकीमध्ये सरकारने शेतकऱ्यांच्या दोन मागण्या मान्य केल्याची माहिती शेतकरी नेत्यांनी दिली आहे. यामध्ये दिल्लीतील प्रदुषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी करण्यात येत असलेल्या कायद्यांमधून शेतकऱ्यांना वगळण्याची मागणी मान्य करण्यात आली आहे. तर प्रस्तावित वीज सुधारणा विधेयकात दुरूस्ती करण्यासंदर्भात किंवा रद्द करण्यासंदर्भात सरकारने तयारी दाखवली आहे. पण हमीभाव कायद्यासंदर्भात सरकारने समिती स्थापन करण्याची तयारी दाखवली आहे. या बैठकीत ३ कृषी कायद्यांवर चर्चा झाली नाही. पण ४ जानेवारी रोजी होणाऱ्या बैकीत उर्वरित दोन मुद्दयांवर चर्चा केली जाईल आणि सकारात्मक तोडगा निघेल अशी माहिती शेतकरी नेत्यानी दिली आहे.

Updated : 30 Dec 2020 7:47 PM IST
Next Story
Share it
Top