LIVE : महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी
X
राज्याच्या राजकारणाच्या इतिहासात मोठी घडामोड घडली. आज रात्री देवेंद्र फडणवीस (deven यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. विशेष बाब म्हणजे देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.
दरम्यान उद्धव ठाकरे हे राज्याचे मुख्यमंत्री होतील. या संदर्भात शरद पवार यांनी सुतोवाच करुन काही तास उलटत नाही तोच राज्यात मोठ्या नाट्यमय परिस्थिती देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी शपथ घेतली आहे. त्यानंतर राज्यात मोठ्या घडामोडी घडत आहे.
सकाळीच शिवसेनेच्या वतीनं खासदार संजय राऊत यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली...
अजित पवार यांची देहबोली संशयास्पद होती, या सगळ्या घडामोडींशी शरद पवारांचा कोणताही संबंध नाही हे ठामपणे सांगू शकतो
अजित पवारांनी राज्याच्या पाठीत खंजीर खुपसला
अजित पवार यांनी शरद पवारांना दगा दिला
पैसा आणि सत्तेचा गैरवापर करुन भाजपने सत्ता स्थापन केली, थोड्याच वेळात शरद पवार आणि उद्धव ठाकरेंची संयुक्त पत्रकार परिषद होणार
दरम्यान संजय राऊत यांच्या प्रेस या कॉन्फरन्स नंतर उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची बैठक होणार आहे.
कॉंग्रेसचे नेते देखील या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत.
सुप्रिया सुळे यांनी स्टेटस ठेऊन पक्ष आणि परिवारात फुट पडल्याचं सांगितलं.
आता कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेनेच्या नेत्यांची मुंबईत बैठक होत आहे...
त्यानंतर या तीनही पक्षाची संयुक्त बैठक होणार आहे.