जिल्हाधिकारी कार्यालयात घोड्याच्या 'पार्कींग' साठी मागणी
सरकारी कार्यालयाच्या पार्किंगमध्ये गाडीऐवजी घोडा दिसला तर? आश्चर्य वाटले ना, मग ही बातमी नक्की वाचा...
X
नांदेड – कोण कधी कसली मागणी करेल याचा नेम नसतो....असाच प्रकार नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयात घडलाय. कार्यालयातील एका कर्मचाऱ्याने जिल्हाधिकाऱ्यांकडे कार्यालयाच्या आवारात घोडा उभा कऱण्यास परवानगी द्यावी अशी अजब मागणी केली आहे. नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयाती सहाय्यक लेखाधिकारी पदावर कार्यरत असलेले सतीश देशमुख यांनी ही मागणी केली आहे. आपण आता व्हिलरऐवजी घोड्यावरुन येणार असल्याने आपल्याला जिल्हाधिकार कार्यालयाच्या आवारात घोडा उभा करण्याची परवानगी मिळाली यासाठी त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज केला आहे.
सतीश देशमुख यांना पाठीचा त्रास आहे. त्यामुळे त्यांना टू व्हीलर चालवणे शक्य नाही म्हणून त्यांनी आता घोडा विकत घेण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या त्यांचे हे पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. घोड्यावरून कामावर येजा करण्यासाठी जास्त सोईस्कर होईल असंही त्यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे. यासंदर्भात सतीश देशमुख यांना संपर्क केला पण त्यांचा फोन स्वीच ऑफ आहे. तर जिल्हा डॉ. विपीन इटनकर यांनी यावर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे.
दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयाने या मागणीसंदर्भात देशमुख यांच्या पाठीच्या दुखण्याच्या अनुषंगाने डॉक्टरांचा सल्ला मागितला होता. त्यामुळे नांदेडच्या शासकीय रुग्णालयातील ऑर्थोपेडिक डॉक्टरांनी पत्र पाठवून घोड्याचा वापर केल्याचा पाठीच्या मणक्यांना जास्त त्रास होऊ शकतो असा अभिप्राय दिला आहे.