धक्कादायक : सोलापुरात फिल्मस्टाईल खंडणी वसुली, कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह
टीम मॅक्स महाराष्ट्र | 12 Feb 2022 2:52 PM IST
X
X
खंडणी गोळा करण्यासाठी गुंड एखाद्या व्यावसायिकाकडे येतात आणि त्याला धमकावून पैसे वसूल करतात असे दृश्य अनेक चित्रपटांमध्ये आपण पाहिले असतील. पण सोलापूर जिल्ह्यात अशाच फिल्मीस्टाईलने प्रत्यक्षात खंडणी वसुली झाली आहे, एवढेच नाही तर ही खंडणी वसुली कॅमेऱ्यातही कैद झाली आहे. सोलापूर जिल्ह्यातील बार्शीमध्ये हा प्रकार घडला आहे.
बार्शीतील तक्रारदार सुरेश भराडिया यांनी नव्याने खडी क्रशरच्या व्यवसायाला सुरुवात केली, पण तेव्हापासून त्यांना खंडणी संदर्भात धमकीचे फोन सुरू झाले, असा आरोप त्यांनी केला आहे. त्यानंतर शुक्रवारी खंडणीखोरांनी धमकी देऊन 50 हजार रुपये वसूल सुद्धा केले. हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे. याबाबत भराडिया यांनी बार्शी ग्रामीण पोलिसात तक्रार दाखल करणार आहेत.
Updated : 12 Feb 2022 2:52 PM IST
Tags: solapur Solapur barshi
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire