Home > News Update > पंढपूरातील रुक्मिणी मातेच्या प्रभावळेला सोन्याचा मुलामा

पंढपूरातील रुक्मिणी मातेच्या प्रभावळेला सोन्याचा मुलामा

पंढपूरातील रुक्मिणी मातेच्या प्रभावळेला सोन्याचा मुलामा
X

पंढरपूर- पंढPandharpurरपूरच्या रुक्मिणी मातेच्या पाठीमागील प्रभावळीला सोन्याची झळाळी देण्यात आहे.श्रावण महिन्या निमित्ताने पुण्यातील भाविक नवनाथ भिसे यांनी ‌रुक्मिणी मातेच्या मंदिरातील मूर्ती मागील चांदीच्या प्रभावळीला सोन्याचा मुलामा दिला आहे. त्यामुळे ही प्रभावळ सुंदर दिसत आहे.

यासाठी नवनाथ भिसे यांना एक लाख रुपयांचा खर्च आला आहे.मागील दीड वर्षापासून कोरोनामुळे विठ्ठल-रुक्मिणी मंदिर दर्शनासाठी बंद आहे याचा परिणाम मंदिर समितीला मिळणाऱ्या देणगीवर झाला आहे. अलीकडेच मुंबई येथील एका भाविकाने मंदिर समितीला प्रथमच एक कोटी रुपयांची देणगी दिली होती. त्यानंतर आता पुणे येथील एका भाविकाने रुक्मिणी मातेच्या पाठीमागील चांदीच्या प्रभावळीचा सोन्याचा मुलामा दिला आहे.सोन्याचा मुलामा दिल्याने प्रभावळीला चकाकी आली असल्याचे मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी सांगितले.

Updated : 6 Sept 2021 5:41 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top