Home > News Update > पुण्यात सापडली २ कोटींची मोगल कालीन सोन्याची नाणी

पुण्यात सापडली २ कोटींची मोगल कालीन सोन्याची नाणी

पुण्यात सापडली २ कोटींची मोगल कालीन सोन्याची नाणी
X

पुण्यात उत्खनना दरम्यान सापडलेली अडीच किलो वजनाची मोगल कालीन सोन्याची नाणी सातारच्या छ.शिवाजी महाराज संग्रहालयात प्रदर्शनास ठेवण्यात आली आहेत. मोगलकालीन 1835 ते 1880 या काळातील तब्बल अडीच किलो वजनाची 216 नाणी सातारच्या छ. शिवाजी महाराज संग्रहायलात प्रदर्शनासाठी ठेवण्यात आली आहेत

ही नाणी पुण्यातील चिखली येथे घराच्या बांधकामासाठी खोदताना आढळून आली होती. पुणे पोलिसांनी ही नाणी जप्त करत हा ऐतिहासिक ठेवा असल्याने पुणे येथील पुरातत्त्व विभागाच्या ताब्यात देण्यात आला. मात्र पुणे आणि मुंबई येथे शासकीय शिवकालीन संग्रहालय नसल्याने नाण्यांचा ऐतिहासिक ठेवा लोकांसमोर यावा यासाठी साताऱ्याच्या छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात जतन करून प्रदर्शनासाठी ठेवण्यात आला असल्याची माहिती छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयाचे अभिरक्षक प्रवीण शिंदे यांनी दिली आहे.



Updated : 13 March 2021 6:52 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top