सोने चांदी विक्रमी भाव: सोने 72 तर चांदी 80 हजारांच्या पुढे...
X
सोने चांदीच्या भावात नवनवीन विक्रम नोंदवले जात आहेत. गेल्या सहा महिन्यात सोन्याच्या भावात 25 टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर चांदीचे भाव 80 हजारांच्या वर पोहचले आहेत.
भारतीय बाजारात 24 कॅरेट सोन्याचे भाव प्रति तोळा 71,100 रुपये पोहचला, GST लावून हाच भाव 73,300 पर्यंत गेलाय. तर चांदी प्रति किलो 80,000 हजारांपर्यंत पोहचला GST धरून 82,400 पर्यंत पोहचला आहे.
1 एप्रिलला 77 हजार रुपये प्रतिकिलो असलेली चांदी आज 80 हजारावर पोहचली आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात मागणी वाढल्याने सोने चांदीच्या दरात सातत्याने वाढ होत आहे.
सोन्याच्या भावात यंदा विक्रमी नोंद झली आाहे.अमेरिकेत व्याजदरात कपातीनंतर डॉलर कमकुवत झाले, यातून वाढ झाल्याचे जाणकारांच मत आहे. गेल्या सहा महिन्यांत सोन्याच्या भावात २५ टक्के तर यंदाच्या तीन महिन्यांतच १० टक्के वाढ झाली आहे.
महागाईमुळे सोन्याच्या मागणीत वाढ : रिझर्व्ह बँक
भारतीय रिजर्व बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी असं म्हटलंय की, यंदा गरजेपेक्षा जास्त उष्णता जाणवू शकते. पाऊसाचा परिमाण त्यातून काही पिकांचे नुकसान होऊ शकते. काही काळ कमी झालेली महागाई वाढेल. सोन्याला झळाळी येईल. महागाई बाढल्याने सोनेही महागते. कारण गुंतवणूक वाढते. तो महागाईपासून बचावाचा प्रयत्न असतो असं मत त्यांनी व्यक्त केलं आहे.
दोन दशकांपासून सतत वाढ-
गेली दोन दशकं म्हणजेच वीस वर्षांपासून सातत्याने सोन्याच्या भावात वाढ होतांना दिसून येते. 2004 साली सोन्याला प्रति तोळा साडे पाच ते सहा हजार रुपये एवढा भाव होता. आज 72 हजार रुपयांपर्यंत पोहचला आहे.
कमोडिटी तज्ञांचं म्हणणं आहे की, महागाई वाढल्यास सोन्याचे दर आणखी वाढत राहतात. ही सतत चालणारी प्रक्रिया आहे. सोन्यात अंतरराष्ट्रीय परिणामांचाही परिणाम दिसतो.अमेरिकेतील निवडणुकीचा परिणामही सोन्यावर होऊ शकतो. सोन्याच्या किंमतीत आणखी तेजी येऊ शकते. २०२५ पर्यंत सोन्याचे भाव वाढतच राहतील अशी स्थिती आहे असं मतही सोने जाणकारांचं आहे.