'शेतमालाला लाभकारी मूल्य देऊन शेतकऱ्यांना दिलासा द्या'
X
शेतकऱ्यांच्या शेतमालाला लाभकारी किंमत देऊन लाभ द्यावा,या मागणीसाठी आज भारतीय शेतकरी संघाने बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन सुरु केलं आहे.
शेतकऱ्याला त्याच्या उत्पादनाच्या किंमतीच्या आधारावर मोबदला देण्याची हमी देण्याच्या संदर्भात निवेदन दिले होते किसान संघाच्या निवेदनाकडे लक्ष वेधून, अशी विनंती केली आहे की, शेतकऱ्यांची लाभकारी किमंत निश्चितपणे करुन लाभ द्यावा आणि अन्य मागण्यांसाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भारतीय किसान संघ विदर्भ प्रांतच्या वतीने एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले आहे.तसेच मागण्यांचा सकारात्मक विचार न केल्यास तीव्र आंदोलन भारतीय किसान संघाच्या वतीने करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.
यावेळी किसान संघाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत सरकारच्या धोरणाचा निषेध केला. दरम्यान यावेळी बोलताना भारतीय किसान संघाचे प्रांत महामंत्री बाबुराव देशमुख म्हणाले की, आधारभूत किंमत ही फसवेगिरी आहे. केवळ 9 टक्केच शेतकऱ्यांना आधारभूत किंमत मिळते त्यामुळे शेतकऱ्यांना उत्पन्नात मिळणाऱ्या नफ्यासह लाभ मिळावा अशी मागणी भारतीय किसन संघाने केली आहे.