Home > News Update > धक्कादायक: पावसासाठी लहान मुलींची नग्न अवस्थेत धिंड

धक्कादायक: पावसासाठी लहान मुलींची नग्न अवस्थेत धिंड

धक्कादायक: पावसासाठी लहान मुलींची नग्न अवस्थेत धिंड
X

दमोह : मध्य प्रदेशातील अनेक भागांमध्ये तीव्र दुष्काळ पडल्याचे पाहायला मिळत आहे. ज्या भागात तीव्र दुष्काळ आहे तेथे काही धक्कादायक परंपरा जपल्या जात असल्याचे समोर आले आहे.अशीच एक धक्कादायक घटना दमोह जिल्ह्यात घडली आहे. दुष्काळापासून मुक्ती मिळवण्यासाठी गावातील सहा लहान मुलींना नग्न करून फिरवण्यात आल्याची चीड आणणारी घटना समोर आली आहे. त्यानंतर देशभरातून संताप व्यक्त होत आहे

या लहान मुलींना नग्न करून त्यांच्या खांद्यावर एक मुसळ देण्यात आलं होतं ज्या मुसळाला एक बेडूक बांधण्यात आला होता , असं केल्याने पाऊस होतो असा समज येथील काही स्थानिक नागरिकांमध्ये आहे. विशेष म्हणजे या मुलींना नग्न अवस्थेत संपूर्ण गावातून फिरवताना गावातील स्त्रिया भजन गात असतात अशी परंपरा आहे, दरम्यान यावेळी सहभागी झालेल्या स्त्रिया वाटेतील घरांमधून पीठ आणि डाळी मागतात, जमा झालेलं साहित्य गावातील एका मंदिरात जमा करून त्यानंतर गाव जेवण घातले जाते, असे केल्याने पाऊस पडतो अशी अंधश्रद्धा या गावकऱ्यांमध्ये आहे.

रविवारी दमोह गावात असाच धक्कादायक प्रकार समोर आला आहे त्यानंतर देशभरातून यावर संतप्त प्रतिक्रिया येताना दिसत आहे.

दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतल्याची माहिती मिळत आहेत. याबाबत पोलीस पुढील तपास करत असून कडक कारवाई केली जाणार असल्याची माहिती पोलीस प्रशासनाने दिली आहे.

Updated : 7 Sept 2021 10:18 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top