अदानी-हिडेनबर्ग प्रकरणी सेबीचा अहवाल लांबणीवर, न्यायालयात नेमकं काय घडलं?
X
हिंडेनबर्ग या अमेरिकन शॉर्ट सेलर कंपनीने अदानी गृपवर गंभीर आरोप केले होते. त्याप्रकरणी सेबी आज सर्वोच्च न्यायालयात अहवाल सादर करणार होती. मात्र अदानी यांच्यावर करण्यात आलेल्या घोटाळ्याच्या आरोप प्रकरणी सेबीचा अहवाल लांबणीवर गेला आहे.
हिंडेनबर्ग कंपनीने अदानी समुहावर गंभीर आरोप केले होते. त्यामुळे देशभर खळबळ उडाली होती. त्यामुळे विरोधी पक्षांनी अदानी यांच्या चौकशीची मागणी केली होती. त्यानुसार अदानी प्रकरणी चौकशी करून सेबी 14 ऑगस्ट रोजी सर्वोच्च न्यायालयात चौकशी अहवाल सादर करणार होती. मात्र सेबीने मुदतवाढ मागितल्याने अहवाल लांबणीवर पडला आहे.
भारतीय उद्योगपती गौतम अदानी यांनी भांडवली बाजारातील आपल्या शेअर्समध्ये हेराफेरी केल्याचा आरोप हिंडेनबर्ग या कंपनीने केला होता. त्यानंतर अदानी समुहाच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली होती. त्यामुळे देशभरात खळबळ उडाली होती. त्यानंतर विरोधी पक्षांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणी सेबीने चौकशी करून अहवाल दोन महिन्यात अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. मात्र 2 मे रोजी सेबीने या प्रकरणी चौकशी करण्यासाठी सहा महिन्यांची मुदतवाढ देण्याची मागणी केली होती. मात्र सर्वोच्च न्यायालयाने 14 ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ देत चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. मात्र आज पुन्हा सेबीने 15 दिवसांच्या मुदतवाढीची मागणी केली. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने सेबीला 15 दिवसांची मुदत दिली आहे. त्यानुसार सेबीने 29 ऑगस्ट रोजी या प्रकरणी अहवाल सादर करणे अपेक्षित आहे.
सेबीने केलेली मागणी मान्य करत सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणी अहवाल सादर करण्यासाठी 15 दिवसांची मुदत दिल्याने अदानी हिंडेनबर्ग प्रकरणी अहवाल लांबणीवर पडला आहे.