बीडमध्ये पकडला २७ लाखांचा गांजा
X
बीडच्या शिरूर पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या घोगस पारगाव येथे एका शेतामध्ये सुमारे २७ लाख २७ हजार रुपयांचा गांजा पोलीस प्रशासनाने पकडला आहे. ही कारवाई सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या पथकाने केली आहे. या परिसरात गांजाची शेती केली जात असल्याची गुप्त माहिती पोलीस प्रशासनाला मिळाल्यानंतर पोलिसांनी छापा टाकला. शेतमालकाला अटक केली असून त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. यापूर्वी देखील बीडच्या आष्टी तालुक्यात देखील मोठ्या प्रमाणात गांजा पकडला होता. शिरसाळा पोलीस ठाणे हद्दीतील मोहा परिसरात अशाच पद्धतीने गांजाची शेती केलेली होती. या प्रकरणात केलेली कारवाई सर्वात मोठी होती. आजदेखील अशाच प्रकारची गांजाची शेती आढळून आल्याने बीड जिल्हा अवैध गांजाचे केंद्र म्हणून पुढे येत आहे.
या कारवाईत पोलीस उपअधीक्षक नीरज राजगुरू,पोलीस उपअधीक्षक खाडे पोलीस निरीक्षक एकशिंगे पोलीस उपनिरीक्षक इंगळे पोलीस उपनिरीक्षक तांदळे राजेश पाटील, आनंद शिंदे, येळे खेडकर, दापकर, दिलीप गीते, अनिल मंदे,संतोष गीते या टीमने बोगस पारगाव येथे हा छापा मारला.
या कारवाईत सुमारे ५५४ किलो गांजा ज्याची किंमत २७ लाख २७ हजार ७०,०००रुपये आहे. या शेताच्या मालकाचे नाव संभाजी हरिभाऊ कराड (३७) असून त्याला अटक करण्यात आली आहे. पोलिस उपनिरीक्षक राजेश पाटील यांच्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.