त्या पीडित मुलीची अंतिम इच्छा आईने सांगितली
पारोळा इथल्या सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणी पीडित मुलीच्या आईने आणि बहिणीने सरकारकडे कडक कारनाईची मागणी केली आहे.
X
जळगाव जिल्ह्यातील पारोळा येथे घडलेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणातील दोषी आरोपींना कठोर शासन करावे, आणि प्रकरण जलदगती न्यायालयात चालवावे, या मागण्यांसाठी बुधवारी सर्वपक्षीय नेते, विविध सामाजिक संघटना तसेच पीडितेच्या कुटुंबीयांनी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांची भेट घेऊन निदेन दिले.
दरम्यान "अत्याचार करणाऱ्यांना फाशीच द्या अशी माझ्या मुलीची अंतिम इच्छा होती" अशी माहिती पीडित मुलीच्या आईने सांगितले दरम्यान ही घटना माणुसकीला काळिमा फासणारी असून, पीडितेवर अत्याचार करणाऱ्या तिघांसह त्यांना मदत करणाऱ्या महिलेला फाशीची शिक्षा द्यावी, अन्यथा तीव्र स्वरुपाचे आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला. विविध सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींनी या सामूहिक अत्याचार प्रकरणाचा निषेध नोंदवण्यासाठी जळगावच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात जोरदार निदर्शने केली.
हे प्रकरण अतिशय गंभीर असून, राज्य सरकारने त्याची गांभीर्याने दखल घेतली पाहिजे. राज्यात महिला तसेच दलितांवर अन्यायाच्या घटना सातत्याने घडत आहेत. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. यावेळी पीडितेची आई तसेच बहिणीने आम्हाला पोलीस संरक्षण देण्यात यावे, अशी मागणी केली आहे.