Home > News Update > औरंगाबादेमध्ये बनावट कोरोना लस प्रमाणपत्र देणाऱ्या टोळीचा पर्दाफाश!

औरंगाबादेमध्ये बनावट कोरोना लस प्रमाणपत्र देणाऱ्या टोळीचा पर्दाफाश!

औरंगाबादेमध्ये बनावट कोरोना लस प्रमाणपत्र देणाऱ्या टोळीचा पर्दाफाश!
X

औरंगाबाद : मागील काही दिवसांपासून औरंगाबाद जिल्हाधिकाऱ्यांनी लसीकरणासाठी सक्तीची मोहीम राबवण्यास सुरुवात केली आहे. मात्र , आता शहरात बनावट कोरोना लसीकरणाचे प्रमाणपत्र देणारी टोळी सक्रीय झाल्याने जिल्हा प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. जिन्सी पोलीसांनी 500 ते दोन हजार रुपयांना बनावट प्रमाणपत्र देणाऱ्या तिघांना मंगळवारी रंगेहाथ पकडले. या टोळीने आतापर्यंत 400 पेक्षा जास्त बोगस लस प्रमाणपत्रे दिल्याचे उघड झाले आहे. विशेष म्हणजे घाटी रुग्णालयातील डॉ. रझीउद्दीन हा या टोळीचा मास्टरमाइंड असल्याचे समोर आले आहे.

कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी जिल्हाधिकारी आणि मनपा प्रशासकांमार्फत युद्ध पातळीवर लसीकरण मोहीम राबवली जात असतानाच लसीकरणातील ही बोगसगिरी समोर आल्याने शहरात एकच खळबळ उडाली. या प्रकरणी पोलिसांनी डॉ. शेख रझीउद्दीन फहीमुद्दीन, डॉ. शेख मोहीउद्दीन शेख फहीमुद्दीन, अबु बकर अल हमीद हादी अल हमीद आणि मोहम्मद मुदस्सीर मोहम्मद अश्पाक यांना केली. तर सिस्टर आढाव, शहेनाज शेख सरकारी कागदपत्रांवर लस घेतल्याच्या खोट्या नोंदीवरून बनावट प्रमाणपत्र तयार करत होत्या.

अशा प्रकारे बनावट प्रमाणपत्र देणाऱ्या टोळीची माहिती पोलिसांना खबऱ्यांकडून मिळाली होती. या माहितीच्या आधारे जिन्सी पोलीस ठाण्याचे निरीक्षक व्यंकटेश केंद्रे यांनी उपनिरीक्षक अनंत तांगडे यांना सोबत घेत बनावट ग्राहक तयार केले. त्यांनी टोळीतील काहीजणांशी संपर्क साधला. प्रमाणपत्र देण्याची तयारी दर्शवल्यावर उपायुक्त दीपक गिऱ्हे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी या सर्व टोळीला घेराव घालत डॉक्टर भावंडांसह कामगार अबू बकर, मोहम्मद मुदस्सीर यांना रंगेहाथ पकडले. पोलिसांच्या चौकशीमध्ये, या टोळीने औरंगाबादमध्ये 400 पेक्षा जास्त बनावट प्रमाणपत्र दिली असल्याचे उघडकीस आले.

Updated : 15 Dec 2021 11:53 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top