गणेशोत्सवार कडक निर्बंध; मिरवणुकांवर सांगली पोलिसांनी घातली बंदी
X
सांगली : मिरजेत यंदा गणेशोत्सवावर कडक निर्बंध असणार आहेत. पोलीस प्रशासन आणि गणेश मंडळाच्या पदाधिकारी यांच्या बैठकीत महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहे. श्रीं चे आगमन, विसर्जनाच्या मिरवणुकांवर बंदी घालण्यात आली आहे तर उत्सवातील गर्दी टाळण्यासाठी फेसबुकद्वारे आरती घेणेचे आवाहन पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
सांगलीच्या मिरजेत दरवर्षी मोठ्या प्रमाणात गणेशोत्सव साजरा होतो. यंदा मात्र कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर अनेक निर्बंध गणेशोत्सवावर असणार आहेत. यामध्ये रस्त्यावर मंडप न उभारण्यापासून मिरवणुकांवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. तर गणेश उत्सव काळातील गर्दी टाळण्यासाठी फेसबुकद्वारे आरती घेणेचे पोलीस प्रशासनाने गणेश मंडळांना आवाहन केले आहे.
तसेच डॉल्बीला पूर्णपणे बंदी असणार आहे. गणेश मंडळांनी सामाजिक प्रबोधनपर उपक्रम राबवण्याबाबत सूचित करण्यात आले आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर सांगली पोलीस प्रशासन अलर्ट झाल्याचे पाहायला मिळत आहे.
साध्या पध्दतीने आणि गर्दीमुक्त गणेशोत्सव साजरा करण्यासाठी पोलीस यंत्रणेने प्रयत्न सुरू केले आहेत. यामुळे यंदाही सांगली मिरजेतील गणेशोत्सव हा कोरोना नियमांच्या निर्बंधानुसारच साजरा होणार आहे.