Home > News Update > कोरोनामुळे नवे संकट, फंगल इन्फेक्शनचे रुग्ण वाढले

कोरोनामुळे नवे संकट, फंगल इन्फेक्शनचे रुग्ण वाढले

कोरोनामुळे नवे संकट, फंगल इन्फेक्शनचे रुग्ण वाढले
X

कोरोनाची बाधा झालेल्या रुग्णांमध्ये आता फंगल इन्फेक्शन (Mucormycosis) या आजाराची लक्षणे दिसू लागली आहेत आणि हे इन्फेक्शन नवीन संकट म्हणून समोर आले आहे. मुंबई आणि अहमदाबादमध्ये असे रुग्ण आढळल्याचे वृत्त काही माध्यमांनी दिले आहे.

कोरोनाच्या ज्या रुग्णांची प्रतिकारशक्ती कमी आहे, त्यांना या इन्फेक्शनची बाधा होत आहे. काही दिवसांपूर्वी अहमदाबादमध्येही २ रुग्णांचा या इन्फेक्शनमुळे मृत्यू झाला आहे. फंगल इन्फेक्शनची लक्षणे डोळ्यांना सूज, अल्सर, कमी दिसणे असे आहे. एनडीटीव्ही खबरच्या बातमीनुसार अहदमबादमध्ये ५ तर मुंबईत २० जणांना याची बाधा झाली आहे. डायबेटीस असणाऱ्या रुग्णांना या फंगल इन्फेक्शनचा धोका जास्त आहे.

Updated : 15 Dec 2020 11:52 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top