Home > News Update > मेहुल चौक्सी अखेर पोलिसांच्या जाळ्यात, कशी झाली अटक?

मेहुल चौक्सी अखेर पोलिसांच्या जाळ्यात, कशी झाली अटक?

मेहुल चौक्सी  अखेर पोलिसांच्या जाळ्यात, कशी झाली अटक?
X

भारताच्या पंजाब नॅशनल बँकेंला 13500 कोटी रुपयाचा चुना लाऊन परदेशात पळालेल्या हिऱ्याचे व्यापारी मेहूल चोक्सी आणि निरव मोदी पैकी मेहुल चोक्सीला अखेर अटक करण्यात आली आहे. मेहूल चौक्सी पंजाब नॅशनल बॅंकेचं (Punjab National Bank scam) 13500 कोटीचं कर्ज बुडवून फरार झाला होता.. मेहुल चौक्सीचा हिऱ्याचा व्यापार आहे.

कुठं झाली अटक?

मेहुल चोक्सीला डोमिनिका येथे पोलिसांनी अटक केली आहे. तो सध्या या ठिकाणी वास्तव करत आहे. 23 मेला तो रोजी अँटिगा येथून फरार झाला होता. जानेवारी 2018 पासून तो तेथे राहत होता, अशी माहिती कॅरेबियन बेटावरील रॉयल पोलीस दलाने दिली होती. आता डोमिनिका पोलिस मेहुलला अँटिगा पोलिसांच्या ताब्यात देणार असल्याचं समजतंय. एकाच वेळी अनेक कॅरिबियन देशांचं नागरिकत्व मेहुलकडे असल्याने तो पोलिसांना चकमा देण्यात यशस्वी होतो.

मेहुल चौक्सीला भारतात कधी आणणार?

मेहुलला अटक झाल्यानंतर आता त्याला भारतात आणलं जाणार आहे. त्या संदर्भात प्रयत्न सुरु झाले असून भारत सरकारच्या अधिकाऱ्यांनी या संदर्भात संपर्क केल्याची माहिती आहे.

Updated : 27 May 2021 11:49 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top