#foxconnvedanta मग रिफायनरीला विरोध कुणी केला? फडणवीसांचा रशियातून विरोधकांवर पलटवार
X
महाराष्ट्रात होऊ घातलेला foxconnvedanta सेमीकंडक्टर प्रकल्प गुजरात गेल्यावरुन राजकीय वादळ उठले असताना आता विरोधकांच्या आक्षेपाला रशिया दौऱ्यावर असलेले विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राजकीय स्वार्थीपणासाठी चुकीचे, नकारात्मक आणि निराधार दावे केले जात आहेत असे प्रत्युत्तर दिले आहे.
वेदांता-फॉक्सकॉन सेमीकंडक्टर प्रकल्पाच्या मुद्यावरुन महाराष्ट्रात राजकारण तापलेलं असताना विरोधकांना शिंदे फडणवीस सरकारला टार्गेट केलं आहे. राज्यभर शिवसेना आणि राष्ट्रवादीनं आंदोलन सुरु केलं आहे. कॉंग्रेसनंही राज्य सरकारवर टिका केली आहे. काल रात्री उशिरा वेंदाता कंपनीचे अनिल अगरवाल यांनी ट्विट केलं आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची चर्चा केल्याचे सांगितले गेले.
त्यामधे गुजरात बरोबरच महाराष्ट्राला सलग्न प्रकल्प मिळणार असल्याचे आश्वासन देण्यात आल्याचे समजते. यावर उद्योग मंत्री उदय सामंत यांनी वेदांता-फॉक्सकॉनच्या संलग्न प्रकल्पासाठी महाराष्ट्राची निवड करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल वेदातांचे अध्यक्ष अनिल अगरवाल यांचे आभार व्यक्त करत महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक यावी आणि राज्यातील बेरोजगारी दूर व्हावी यास्तव युती सरकार कटिबद्ध आहे, असे सांगितले.
अण्णाभाऊ साठी तैलचित्र आणि पुतळा अनावरणासाठी रशिया दौ-यावर असलेले विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना ट्विट करुन उत्तर दिले आहे.
वेदांता-फॉक्सकॉनच्या संलग्न प्रकल्पासाठी महाराष्ट्राची निवड करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार! महाराष्ट्रात गुंतवणूक यावी यासाठी आम्ही कायमच स्पर्धात्मक आणि व्यवसायपूरक राहू. मला खेद होतो की केवळ राजकीय स्वार्थीपणासाठी अतिशय चुकीचे, नकारात्मक आणि निराधार दावे केले जात आहेत. पण असे करून ते केवळ त्यांच्या अकार्यक्षमतेचेच प्रदर्शन करीत आहेत असे फडणवीस म्हणाले.
माझा या नेत्यांना प्रश्न आहे की, महाराष्ट्रात 3.5 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक रिफायनरीच्या माध्यमातून येत असताना त्याला विरोध कुणी केला, हा प्रकल्प कुणी लांबविला? स्वतः कार्यक्षम होण्यावर आधी लक्ष केंद्रीत करा, ना की अस्वस्थता आणि नकारात्मकतेवर ! असाही खडा सवाल फडणवीसांना शिवसेनेला केला आहे.
#FoxconnVedanta