Home > News Update > जेडीयूचे माजी अध्यक्ष शरद यादव यांचं निधन

जेडीयूचे माजी अध्यक्ष शरद यादव यांचं निधन

जेडीयूचे माजी अध्यक्ष शरद यादव यांचं निधन
X

जनता दल युनायटेडचे ​​माजी राष्ट्रीय अध्यक्ष आणि माजी केंद्रीय मंत्री शरद यादव (Sharad Yadav) यांनी वयाच्या ७५ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. गुरुग्राममधील फोर्टिस रुग्णालयात गुरुवारी रात्री त्यांचे निधन झाले. श्वास घेण्यास त्रास होत असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या मुलीने त्यांच्या मृत्यूची माहिती दिली असून त्यांचे पार्थिव दिल्लीतील छतरपूर येथील त्यांच्या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे.

जेडीयूचे माजी अध्यक्ष शरद यादव यांचे गुरुवारी रात्री दिल्लीतील एका खासगी रुग्णालयात निधन झाले. शरद यादव यांची मुलगी शुभशिनी यादव यांनी ही माहिती दिली आहे. शुभशिनीने ट्विटमध्ये लिहिले- 'पापा आता नाही'. ते 75 वर्षांचे होते. शरद यादव यांची प्रकृती बऱ्याच दिवसांपासून खराब होती. गुरुवारी संध्याकाळी त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना दिल्लीतील फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आले. रात्री ९ वाजता त्यांचे निधन झाले.पंतप्रधान नरेंद्र मोदी, लालू यादव, बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव, विरोधी पक्षनेते विजय सिन्हा यांच्यासह अनेक नेत्यांनी त्यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.

Updated : 13 Jan 2023 8:48 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top