Home > News Update > देशातल्या जवळपास सगळ्याच चळवळी संपल्यात जमा आहेत - राजू शेट्टी

देशातल्या जवळपास सगळ्याच चळवळी संपल्यात जमा आहेत - राजू शेट्टी

देशातल्या जवळपास सगळ्याच चळवळी संपल्यात जमा आहेत - राजू शेट्टी
X

सांगली : देशातल्या जवळपास सगळ्याच चळवळी संपल्यात जमा आहेत. केवळ कामगार आणि शेतकरी चळवळ तग धरून उभी आहे. ही पण चळवळ संपवण्याचा घाट घातला जात आहे. देश खासगीकरणाच्या विळख्यात घालवण्यासाठी या चळवळ संपवण्याचे कारस्थान सुरू आहे.सामान्यांना आधारवड असणाऱ्या सरकारी कंपन्या एका पाठोपाठ एक विकण्याचा सपाटा केंद्र सरकारकडून सुरू आहे. एअर इंडिया विकली आता कधीही बीएसएनएलचा नंबर लागू शकतो. ही खुली व्यवस्था मक्तेदारीला चालना देणारी आहे. हे मोडून काढण्याची ताकद फक्त चळवळीमध्ये आहे, त्यामुळे आपआपसातील मतभेद विसरून देशभरातील सर्व चळवळी एकत्र करूया असं आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी केले ते सांगलीत पत्रकारांशी बोलत होते.

दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी शेतकऱ्यांची दिवाळी तर काळी होणार आहे, मात्र यावरून 'मातोश्री' आणि 'वर्षा' वरील दिवाळीवर आक्षेप घेणाऱ्यांनी हिंमत असेल पंतप्रधानांच्या घरातील दिवाळीवरही बोलावं असं म्हणत माजी मंत्री सदाभाऊ खोत यांना टोला लगावला आहे.

दरम्यान सांगली जिल्ह्याच्या सीमेवरील कारखाने एक रकमी एफआरपी द्यायला तयार आहेत मात्र, सांगलीतील कारखाने कुणाच्या सांगण्यावरून जर एक रकमी एफआरपी देत नसतील तर त्यांना चळवळी झटका बसेल असं म्हटलं आहे.

Updated : 26 Oct 2021 6:28 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top