Home > News Update > माजी आमदार कपिल पाटील (Kapil Patil) यांचा कॉंग्रेसमध्ये प्रवेश

माजी आमदार कपिल पाटील (Kapil Patil) यांचा कॉंग्रेसमध्ये प्रवेश

माजी आमदार कपिल पाटील (Kapil Patil) यांचा कॉंग्रेसमध्ये प्रवेश
X

राजकीय क्षेत्रात मोठी घडामोड घडली आहे. समाजवादी गणराज्य पक्षाचे (samajawadi Ganarajya Party) संस्थापक माजी आमदार कपिल पाटील यांनी कॉंग्रेस Indian National Congres) पक्षात प्रवेश केला आहे. समाजवादी गणराज्य या पक्षाला त्यांनी कॉंग्रेसमध्ये विलीन केले आहे.

दिल्ली येथे कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun kharge), महाराष्ट्राचे प्रभारी चेन्निथाला, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार, मुंबई अध्यक्ष वर्षा गायकवाड(Varsha Gaikwad) यासह इतर महत्वाच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत त्यांनी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

कपिल पाटील हे शिक्षक आमदार होते. जनता दल (Janata Dal) या पक्षात ते सक्रीयपणे कार्यरत होते. पक्षासोबत मतभेद झाल्यानंतर त्यांनी समाजवादी गणराज्य पक्षाची स्थापना केली. महाविकास आघाडीकडून पाठबळ मिळाल्यास ते पुन्हा आमदार म्हणून निवडून येऊ शकतात. वर्सोवा अथवा गोरेगाव विधानसभा मतदारसंघातून त्यांना कॉंग्रेसकडून उमेदवारी मिळू शकते.

Updated : 20 Oct 2024 9:04 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top