लसीकरणाच्या अपयशाची जबाबदारी घेऊन केंद्रीय आरोग्यमंत्री राजीनामा देणार का? - पी. चिदंबरम
X
देशातील कोरोना परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत असताना नियंत्रणासाठी लसीकरण हा केवळ एकच मार्ग दिसत आहे. परंतु केंद्र सरकारच्या ढिसाळ कारभारामुळे १ मेपासून सर्वांसाठी लसीकरण हा कार्यक्रम अपयशी ठरण्याची चिन्हे दिसत आहे. लोकांना लसीकरण केंद्रावर माघारी फिरावे लागले ,तर केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ.हर्षवर्धन राजीनामा देणार का? असा सवाल माजी गृहमंत्री पी चिदंबरम यांनी उपस्थित केला आहे. देशात उद्यापासून म्हणजे 1 मे पासून तिसऱ्या टप्प्यातील लसीकरणाला सुरुवात होत आहे. या तिसऱ्या टप्प्यातील लसीकरणाच्या वेळी लोकांना जर लस मिळाली नाही, त्यांना केंद्रावरून परत जावं लागलं तर केंद्रीय आरोग्यमंत्री राजीनामा देणार का असा सवाल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी चिदंबरम यांनी केला आहे. देशात ऑक्सिजन आणि लसींची कोणतीही कमतरता नाही या केंद्रीय आरोग्य मंत्र्यांच्या वक्तव्यावर आपण अस्वस्थ असल्याचं पी चिदंबरम यांनी म्हटलं आहे. ड