साई रिसॉर्ट प्रकरणी माजी मंत्री अनिल परब यांची संपत्ती (ED) ईडीकडून जप्त
X
शिवसेना ठाकरे या गटाचे नेते अनिल परब (Anil Parab ) हे आता आणखी अडचणीत आले आहेत. साई रिसॉर्ट (Sai Resort) प्रकरणी ईडी कडून त्यांची दहा कोटीची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. माजी मंत्री अनिल परब यांच्यावर ईडीकडून (ED ) कारवाई करण्यात आली आहे. मागील काही दिवसापासून अनिल परब याच्यासंबधीत असलेले साई रिसॉर्ट प्रकरण चर्चेत आले होते.
या साई रिसॉर्ट प्रकरणी सक्ती संचनालयाकडून ( ईडी ) कार्यवाही करत १०.२० कोटींची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे . या कार्यवाही प्रकरणी सक्तवसुली संचनालयाकडून ( ईडी ) एक प्रसिध्दीपत्रक काढून माहिती देण्यात आली आहे. या कार्यवाहीत साई रिसॉर्ट आणि रत्नागिरीतील ४२ गुंठे जमीन यांचा समावेश आहे.
सक्तवसुली संचनालयाकडून ( ईडी ) एक प्रसिध्दीपत्रकात, साई रिसॉर्ट प्रकरणी अनिल परब स्वतःची मालक म्हणुन ओळख लपवत विभास साठे यांच्या नावे परवानगी मिळवल्या. परवानगी घेताना महाराष्ट्र सरकारची व ग्रामपंचायतची फसवणुक करुन परवानगी मिळवल्या आहेत. यामुळे ईडीने या प्रकरणामधली 42 गुंठे जमीन जप्त करत साई रिसॉर्ट वर कार्यवाही केली आहे. या साई रिसॉर्ट प्रकरणी भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या ट्विट करत कार्यवाही होणार असल्याचे संकेत दिले होते . ईडीकडून आज अनिल परब यांच्यावर कार्यवाही करण्यात आली आहे.